शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मरणानंरही यातना संपेनात, घाटावरही वेटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात दररोज ८० ते ९० कोविड रुग्णांचा मृत्यू होत आहे. शहरात ४० ते ५० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात दररोज ८० ते ९० कोविड रुग्णांचा मृत्यू होत आहे. शहरात ४० ते ५० मृत्यू होत आहेत. त्यात अन्य आजारांनी, वृद्धावस्थेमुळे होणारे मृत्यू विचारात घेता दररोज १५० ते २०० मृत्यू होत आहेत. शहरात १६ घाट आहेत. यातील काही प्रमुख घाटावर दररोज ४५ ते ५० मृतदेह अंतिम संस्कारासाठी येत आहेत. घाटावर अंत्यसंस्कारासाठी ओटे मिळत नसल्याने ओट्याखाली अंतिम संस्कार करावे लागत आहेत. घाटावरील चित्र मन हेलावणारे आहे.

शहरातील गंगाबाई, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम अशा प्रमुख घाटांवर प्रत्येकी ४५ ते ५० अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोविड रुग्णावर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी सकाळपासून रात्रीपर्यंत व्यस्त असतात. त्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना अंत्यसंस्कारासाठी आणावे लागते. महापालिकेच्या १६ शववाहिका व खासगी १० शववाहिका आहेत. या कमी पडत असल्याने मृतदेहाचे वेटिंग सुरू आहे. मृतकांच्या नातेवाइकांना शववाहिकेची प्रतीक्षा करावी लागते. नाइलाजाने अ‍ॅम्ब्युलन्समधून मृतदेह घाटावर आणला तरी कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अंत्यसंस्कार करणाऱ्यांना बाधा होण्याचा धोका आहे.

.......

गृह विलगीकरणातील मृतकांना प्रतीक्षा

शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळत नसल्याने गृह विलगीकरणात शहरात ५० हजारांहून अधिक कोविड रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात असताना उपचाराअभावी अनेकांचे बळी जात आहेत. अशा मृतकांवर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांना संकटाचा सामना करावा लागत आहे. शववाहिकेसाठी मनपाच्या वॉररूमला फोन केल्यानंतर तीन ते चार तासांनी शववाहिका येते. तोपर्यंत कोविड रुग्णाचा मृतदेह घरात पडून असतो.

...

लाकडाचा साठा मोजकाच

महिनाभरापासून मृतकांची संख्या दररोज वाढत असल्याने घाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध करताना मनपाच्या आरोग्य विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. महिनाभर पुरणारे लाकूड आठडाभरात संपत आहे. सध्या काही घाटांवर दोन-तीन दिवस पुरेल इतकाच लाकडाचा साठा आहे. खबरदारी म्हणून आधीच लाकूड मागविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

...

तातडीने ओटे उभारावे

शहरातील मृतकांचा आकडा विचारात घेता व कोविड संकट पुन्हा किती दिवस राहील, याची शाश्वती नसल्याने शरातील घाटावर मनपा प्रशासनाने नवीन ओटे बांधण्याची गरज आहे. तसेच नादुरुस्त ओटे दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.