शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य

By admin | Updated: December 24, 2014 00:46 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी पाण्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री : ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ अभियाननागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी पाण्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील चिटणीस सेंटरमध्ये ‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नागपूर विभागासाठी आयोजित विभागीय कार्यशाळेचे उद््घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मध्य प्रदेशच्या धर्तीवर जलसंवर्धनाची कामे राज्यात करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला. टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना सुरू करण्यात आली आहे. कृषी आणि जलसंवर्धनाशी संबंधित सर्व योजना एकत्र करून पाण्याच्या नियोजनाला चळवळीचे रूप दिले जात आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व अधिकार संबंधित समितीला देण्यात आले आहे, चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार तर समाधानकारक काम न झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.पाण्याचे आॅडिट होणारपुढच्या काळात पाण्याचे आॅडिट करण्यात येणार आहे. या अंतर्गत गावात पाण्याचा वापर, सिंचनासाठी लागणारे पाणी, सध्याचा वापर, भविष्यात पिण्यासाठी लागणारे पाणी आणि कमी पडत असेल तर त्याची गरज तपासली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा केली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, विभागीय आयुक्त अनुप कुमार, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, नागपूर विभागातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)