शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

आज किस डे :  प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचेही माध्यम चुंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:45 AM

आज ‘किस डे’... व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सहावा आणि प्रत्यक्ष प्रेम दिनापूर्वीचा महत्त्वाचा दिवस. दिनाच्या सरताक्षणी पश्चिमेकडे मावळतीला जाणारा सूर्यबिंब जेव्हा धरणीचे एक दीर्घ चुंबन घेतो तेव्हा आभाळही लाजेने लालबुंद होते. रोजचीच असते ही क्रिया... पण

ठळक मुद्देअत्युत्कट प्रेम भावनेचा आविष्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिनाच्या सरताक्षणी पश्चिमेकडे मावळतीला जाणारा सूर्यबिंब जेव्हा धरणीचे एक दीर्घ चुंबन घेतो तेव्हा आभाळही लाजेने लालबुंद होते. रोजचीच असते ही क्रिया... पण प्रेमाचे, समर्पणाचे आणि उगवतीला पुन्हा भेटण्याचे भाव त्यात असतात. किस अर्थात चुंबन म्हटले की केवळ प्रणयाची भावना नाही, त्यात प्रियकराच्या प्रेमाचे, आईच्या मायेचे, वडिलांच्या अभिमानाचे, विजयी आनंदाचे, उत्साह आणि समर्पणाचाही आविष्कार घडविणारे असते. आज ‘किस डे’... व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सहावा आणि प्रत्यक्ष प्रेम दिनापूर्वीचा महत्त्वाचा दिवस.चुंबन म्हणजे प्रेमाच्या अभिव्यक्तीचे शाश्वत माध्यम. याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियकरावर प्रेमाचा वर्षाव करू शकता. हा तोच पहिला गोड स्पर्श होय, ज्यातून प्रेमभावनेची जाणीव निर्माण होते. रोझ डे पासून सुरू झालेला प्रेम दिनाचा प्रवास प्रेमीयुगलांसाठी तसा आनंददायी असतोच. या प्रवासात प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे असे टप्पे येतात. या प्रत्येक टप्प्यातून प्रेमाचे वेगवेगळे प्रतिबिंब प्रियकर प्रेयसीपुढे उलगडतो. पण किस डेला त्यांच्या भावनांची उत्कटता खऱ्या अर्थाने प्रेयसी आणि प्रियकराला कळते. त्या अर्थाने हा दिवस प्रेमीयुगुलांसाठी खासच म्हणावा. हो, पण त्याला केवळ प्रणयाचे माध्यम आणि संधी समजू नका. ती एक पवित्र भावना असते, तुमच्या समर्पणाची आणि पवित्रतेचीही, तेव्हाच प्रेमाला अर्थ असतो.तशी सार्वजनिक स्थळी चुंबनाने प्रेम व्यक्त करणे पाश्चात्य देशात सामान्य बाब असली तरी भारतात मात्र ही बाब खासगी बेडरूमपुरती मर्यादित आहे. मात्र बॉलिवूडच्या चित्रपटातील चुंबनदृश्यांनी त्याला सार्वजनिकच केले असून तरुणाई आता पुढे गेलेली आहे आणि उद्यानात ती व्यक्त करायलाही मागेपुढे पाहत नाही.पण चुंबनाला केवळ प्रेमीयुगुलांच्या भावनांचे माध्यम समजू नका. ते आईच्या मायेचे आणि वडिलांच्या अभिमानाचेही प्रतीक आहे. शतक मारल्यानंतर सचिन आपल्या हेल्मेटचे चुंबन घेताना, सानिया मिर्झा तिच्या ट्रॉफीचे चुंबन घेताना आठवते तुम्हाला. एखाद्या खेळाडूच्या विजयी उत्साहाचीही भावना चुंबनातून व्यक्त होते. हाताचे चुंबन घेऊन भेटण्याचे आणि फ्लाइंग किस करून चाहत्यांचे अभिवादन करण्याचे साधनही चुंबनच होय. मग चुंबन म्हणजे केवळ प्रेमीयुगुलांचेच प्रेम व्यक्त करण्याची गोष्ट नाही, हे जाणलेच असेल तुम्ही. मग व्हॅलेन्टाईन आठवड्याचा ‘किस डे’ साजरा करायला काय हरकत असावी?

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकnagpurनागपूर