शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.च्या ५४१ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 21:20 IST

नागपूर जिल्हा परिषदेकडील गट क व ड वर्गातील तब्बल ५४१ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदोन्नतीच्या पदाच्या कालबद्ध वेतनश्रेणीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जारी केले.

ठळक मुद्देपहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पदोन्नती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर :- नागपूर जिल्हा परिषदेकडील गट क व ड वर्गातील तब्बल ५४१ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदोन्नतीच्या पदाच्या कालबद्ध वेतनश्रेणीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जारी केले.एकाच पदावर १०, २० व ३० वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील पदोन्नतीच्या पदाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून हे धोरण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनादेखील लागू आहे, त्यास अनुसरून आदेश जारी करण्यात आले. यात उल्लेखनीय म्हणजे सर्व संवर्गाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.ज्या संवर्गाचे आदेश जारी करण्यात आले त्यामध्ये लघुलेखक-१, सहायक प्रशासन अधिकारी-१, कनिष्ठ प्रशासन अधिकारी - १५, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)- १४, वरिष्ठ सहायक - ७३, कनिष्ठ सहायक - १०४, परिचर/शिपाई - ३३२ असा एकूण ५४१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ५४१ कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाकडील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे ही योजना लागू करण्याची प्रक्रिया सुरूच असून जिल्हा परिषदेने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करून आघाडी घेतली आहे. ही योजना लागू झाल्यामुळे जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा दोन हजार ते सहा हजारपर्यंत वाढ होणार आहे शिवाय थकबाकीदेखील मिळणार आहे. याबद्दल कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी हा निर्णय जि.प. कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारी