शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचे सत्र सुरुच

By admin | Updated: February 9, 2015 01:02 IST

उपराजधानीत स्वाईन फ्लूची दहशत कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी स्वाईन फ्लू संशयित असलेल्या ३५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. तो बेसा येथील रहिवासी होता.

स्वाईन फ्लू संशयित रुग्णाचा मृत्यू : पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७४ नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूची दहशत कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी स्वाईन फ्लू संशयित असलेल्या ३५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. तो बेसा येथील रहिवासी होता. या महिन्यात स्वाईन फ्लूचे पाच तर गेल्या माहिन्यात १२ बळी गेले आहेत. जिल्ह्यात स्वाईन फ्लू पॉझिटीव्हची संख्या आतापर्यंत ७४ झाली आहे. स्वाईन फ्लू वाढत असताना प्रशासन फक्त बैठकी घेण्यात व आकडेवारी गोळा करण्यात समाधान मानीत असल्याचे वास्तव आहे.आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास ३५ वर्षीय रुग्ण उपचारासाठी आला. त्याच्यात स्वाईन फ्लूची लक्षणे दिसताच त्याला भरती करण्यात आले. परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याचे नमुने घेण्यात आले होते. परंतु आज रविवार असल्याने मेयोची प्रयोगशाळा बंद राहत असल्याने उद्या हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ७४ रुग्ण आढळून आले आहेत तर गेल्या ३८ दिवसांत १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)स्वाईन फ्लूवर बैठक आज सार्वजनिक आरोग्य विभागाने उद्या ९ फेब्रुवारी रोजी स्वाईन फ्लूवर बैठक बोलविली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत फक्त आकडेवारी गोळा केली जाते. ठोस उपाययोजना किंवा रुग्णांना वाचविण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली जात नाही. यामुळेच सध्याच्या घडीला फक्त मेडिकलमध्येच स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड असून तेथेच उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग किंवा महानगरपालिका ही जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. रुग्ण २२, व्हेंटिलेटर दोन मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २२ रुग्ण भरती असताना फक्त दोनच व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिणामी व्हेंटिलेटर अभावी रुग्ण अडचणीत येत आहेत आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये शहरासोबतच विदर्भातून रुग्ण येतात. परंतु आरोग्य विभाग किंवा महानगरपालिका व्हेंटिलेटरची मदत करण्यास समोर येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.