शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्प-अभयारण्यांत प्राणिगणना आज

By admin | Updated: May 14, 2014 00:10 IST

वन विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ व १५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र प्रगणना करण्यात येणार आहे. यासाठी वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह ताडोबा-अंधारी, नागझिरा,

पाणवठय़ांजवळ मचाणी : कर्मचार्‍यांसह एनजीओ करणार निरीक्षण

नागपूर : वन विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ व १५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र प्रगणना करण्यात येणार आहे. यासाठी वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह ताडोबा-अंधारी, नागझिरा, न्यू नागझिरा, कोका, नवेगाव नॅशनल पार्क, नवेगाव, मेळघाट, मानसिंगदेव, बोर, उमरेड कर्‍हांडला, टिपेश्‍वर, बोर व न्यू बोर अभयारण्यात तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जंगलातील पाणवठय़ाशेजारी मचाण तयार करण्यात आल्या आहे.

१४ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. यानंतर रात्रभर जंगलातील मचाणीवर बसून वाघासह विविध वन्यजीवांची प्रगणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यात वन्यजीवप्रेमींना प्रत्येक सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार वन्यजीव विभागाकडे आतापर्यंत सुमारे १५0 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष प्रगणनेसाठी वन विभागाने एक नियमावली जारी केली आहे.

त्यानुसार या प्रगणनेत सहभागी होणार्‍यांना त्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागेल. वन विभागाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मचाणीवरील वन्यजीवप्रेमींसोबत एक वन विभागाचा प्रतिनिधी राहणार आहे. शिवाय मचाणवर बसल्यानंतर कुणालाही एकदुसर्‍यांशी बोलता येणार नाही. तसेच रात्रीला सर्च लाईट, पॉलिथीन वा बॅग सोबत बाळगता येणार नाही. सोबतच मोबाईलमधील कॅमेर्‍याचा फ्लॅशचा उपयोग करू नये. अशाही सूचना देण्यात आल्या आहे.

वर्धा जिल्ह्यातील बोर व न्यू बोर अभयारण्य १२५ वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. गत सात वर्षांपासून काही ना काही कारणामुळे बोर अभयारण्यातील प्राणी गणना करणे शक्य झाले नाही. २00७ मध्ये अधिकृत प्राणी गणना यशस्वीरित्या करण्यात आली होती. तेव्हापासून अनेकदा प्रयत्न करण्यात आले; पण यशस्वी प्राणिगणना शक्य झाली नाही. यासाठी जुन्या बोरमध्ये २५ तर न्यू बोर अभयारण्यात २४ पाणवठय़ावर तेवढय़ाच मचाणी उभारण्यात आल्या आहेत. ही प्राणिगणना मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) एन.एस. रेड्डी, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक उत्तम सावंत, बोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर, न्यू बोरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे (सावंत) यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

नागझिरा, न्यू नागझिरा, कोका, नवेगाव ही अभयारण्य तसेच नवेगाव नॅशनल पार्क येथे २00 मचाणी बांधण्यात आल्या असून एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्या आहेत.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी प्रगणनेसाठी एकूण १0८ मचाणी उभारण्यात आल्या आहेत. ज्या मचानी मोठय़ा असतील, तिथे दोनहून अधिक वन्यप्रेमींची व्यवस्था करण्यात आली आहे. वन्यप्राणी प्रगणनेसाठी एकूण २५0 जणांची नोंदणी झालेली आहे. तसेच १0८ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. ताडोबा, मोहर्ली व कोळसा या तीन रेंजमधून कर्मचारी व वन्यप्रेमी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)