शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

‘अँटी इन्कम्बन्सी’ तपासून तिकीट कापणार; लोकसभेच्या निकालावरून भाजपने घेतला धडा

By योगेश पांडे | Updated: August 13, 2024 14:41 IST

संघासमोर मांडली स्पष्ट भूमिका

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाला लागलेल्या भाजपकडून महायुतीला काहीही करून सत्तेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लोकसभेत उमेदवार निवडीत चूक झाल्याचा फटका पक्षाला बसला होता. त्यातून धडा घेत भाजपने विधानसभेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या आमदारांविरोधात जनतेतून ‘अँटी इन्कम्बन्सी’चा सूर असेल त्यांचे तिकीट कापण्यात येणार आहे. या मुद्द्याची चाचपणी करण्याचे पक्षाचे हे धोरण निश्चित मानण्यात येत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोरदेखील हीच भूमिका मांडण्यात आली आहे.

मागील आठवड्यात नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार हेदेखील होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत फडणवीस यांनी लोकसभेतील पराभव व विधानसभेतील नियोजनाबाबत संघधुरिणांना माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत अनेकांविरोधात जनतेत रोष होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून काहीजणांना तिकीट देण्यात आले. त्यांचा पराभव झाला.

उमेदवाराची प्रतिमादेखील महत्त्वाची

निवडणुकीच्या राजकारणात पक्षासोबतच उमेदवाराची प्रतिमादेखील महत्त्वाची असते. कितीही राष्ट्रीय व प्रादेशिक मुद्दे असले तरी स्थानिक मुद्यांमुळे निकाल बदलू शकतो. लोकसभेत हे दिसून आले. बदलत्या राजकारणात उमेदवाराच्या अवतीभोवतीच निवडणूक फिरते, या फडणवीस यांच्या शब्दांतूनच भाजपच्या पुढील दिशेचे संकेत मिळाले. ज्या आमदारांबाबत जनतेत जास्त नाराजीचा सूर असेल त्यांचे तिकीट कापण्यात येण्याचीच दाट शक्यता आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा