शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गट नव्हे, कार्यकर्त्यांच्या ‘मेरिट’वरच तिकीट

By admin | Updated: January 5, 2017 02:04 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे.

काँग्रेस कमिटीचे धोरण : नेत्यांची शिफारस चालणार नाही, मुलाखतींना महत्त्व, इच्छुकांची परीक्षा योगेश पांडे नागपूर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे. मुलाखतीदरम्यान ‘मेरिट’च्या भरवशावरच इच्छुक उमेदवारांचे नाव तिकिटासाठी अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मनपा निवडणुकांत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी शहर काँग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नेत्यांमधील आपापसातील वैचारिक मतभेदामुळे पक्षात गट निर्माण झाल्याचे दिसून येत असताना या धोरणाचा कितपत फायदा होईल, असा प्रश्न निर्माण होत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवार अंतिम करण्याच्या दिशेने काँग्रेसनेदेखील पावले उचलली आहेत. शहरातील ३८ प्रभागांसाठी पक्षाकडे ११००हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. ८ जानेवारीपासून इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. याअगोदर कुठे ना कुठे अमूक नेत्याच्या जवळचा उमेदवार किंवा तमूक गटाचा खास या ओळखीवर तिकीट अंतिम व्हायचे. नेत्यांकडून आपल्या उमेदवारासाठी विशेष शिफारसदेखील करण्यात यायची. कुठल्याही नेत्याला प्राधान्य नाही : ठाकरे यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी या धोरणाच्या वृत्ताला दुजोरा दिला. यंदा गटातटाचे राजकारण बंदच होणार आहे. कुठल्याही नेत्याच्या जवळचा उमेदवार म्हणून कुणालाही प्राधान्य देण्यात येणार नाही. प्रक्रियेतून सर्वांना जावे लागणार असून ‘मेरिट’वर नावे अंतिम करण्यात येतील. प्रभागस्तरावरील मेळावे व बैठकांत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी राहायची. त्यातून सक्षम व सर्वमान्य चार नावे त्यांनाच काढण्याची सूचना केली. यामुळे तिकीट वाटपानंतर गटबाजीवर अंकुश येईल, असे त्यांनी सांगितले. कुणीही आपले तिकीट अंतिम समजू नये. यंदा गट-नेता नव्हे तर पक्षसमर्थक उमेदवारांनाच प्राधान्य असेल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.