नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील यंग सायंटिस्ट अवार्ड मिळाल्यानंतर निशांत अग्रवालची किर्ती सर्वत्र पसरली होती. मात्र त्याच्या चमकोगिरीची हाैस फिटता फिटेना. फेसबूकवर आपली प्रोफाईल अन् वेगवेगळ्या एअरपोर्टवरचे फोटो तो अपलोड करीत होता. या फोटो-व्हिडीओनेच आधी मिसेस काळे आणि नंतर सेजल कपूर आणि नेहा शर्माने निशांतवर जाळे फेकले. त्यात तो अडकला अन् देशद्रोही बनला.
रुडकीमधील रहिवासी असलेल्या निशांतचे शिक्षण सेंट गॅब्रियल अकादमीत झाले. नंतर त्याने कुरुक्षेत्र एनआयटीमधून इंजिनिअरिंग केले. त्यानंतर त्याने आधी अंडरग्रॅड इंटर्न टेक्निकल आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशनमध्ये आणि २०१४् मध्ये मोहगाव-डोंगरगावच्या ब्रह्मोस एयरोस्पेस प्लांटमध्ये सिनियर सिस्टीम इंजिनिअर म्हणून नोकरी धरली होती. २०१८ च्या प्रारंभी त्याचे लग्न झाले आणि क्षितिजा नामक सुस्वरूप पत्नी असतानादेखिल तो कानपूरच्या मिसेस काळे (पाकिस्तानी हेर) हिच्याशी फेसबूकवर सलगी करू लागला. काळेसोबतच सेजल कपूर अन् नेहा शर्माने निशांतवर हनी ट्रॅप टाकला. ब्रम्होसच्या माहितीच्या बदल्यात त्याला ३८ हजार यूएस डॉलर महिन्याचे आमिष मिळाले. तब्बल सहा महिने हेरगिरी झाली. पत्नी क्षीतिजाला शंका येताच ती त्याला टोकत होती मात्र तीन वेगवेगळ्या स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंच्या कमाईमुळे निशांत हेरगिरीच्या दलदलीत फसत गेला होता. यूपी एटीएस आणि मिलिटरी इंटेलिजन्स पाकिस्तानी हेर मिसेस काळेला पकडल्यानंतर तिच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये निशांतचा कोड मिळाला. त्याचमुळे देशद्रोही निशांतचा बुरखा फाटला होता.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, तपास यंत्रणातील अत्यंत शिर्षस्थ सूत्रांच्या हवाल्याने ५ ऑक्टोबर २०१८ च्या अंकात 'लोकमत'ने फेसबूक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेत असल्याचे लक्षवेधी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर ८ ऑक्टोबर २०१८ ला पहाटे अचानक मिलिट्री इंटेलिजन्स आणि लखनऊ एटीएस नागपुरात पोहचले. त्यांनी वर्धा मार्गावरील डीआरडीओच्या ब्रह्मोस एयरोस्पेस प्लांटवर आणि उज्वलनगरातील निशांतच्या निवासस्थानी छापा मारून निशांतला प्रदीर्घ चाैकशी केली होती. निशांतला लखनऊला नेल्यानंतर सुमारे दोन महिने त्याची तिकडे 'वेगवेगळ्या'पद्धतीने चाैकशी करण्यात आली होती. त्यानंतर देशद्रोहाच्या आरोपात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे तब्बल सात वर्षे तो कारागृहात होता. मात्र, आज न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार त्याची आता कारागृहातून सुटका होणार आहे.
Web Summary : Nishant, lured by Facebook friends and money, leaked Brahmos secrets to Pakistan. Honey-trapped by three women, he earned thousands monthly. Suspicious wife alerted authorities. Initially sentenced to life, now released after a lighter sentence.
Web Summary : फेसबुक दोस्तों और पैसे के लालच में निशांत ने ब्रह्मोस के रहस्य पाकिस्तान को लीक किए। तीन महिलाओं द्वारा हनीट्रैप में फंसकर, उसने हर महीने हजारों कमाए। संदिग्ध पत्नी ने अधिकारियों को सतर्क किया। पहले आजीवन कारावास, अब हल्की सजा के बाद रिहा।