शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: November 10, 2015 03:43 IST

कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगर भागातील साईप्रसाद गृहनिर्माण सोसायटी येथील एका नवविवाहितेच्या हुंडाबळीप्रकरणी ...

नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगर भागातील साईप्रसाद गृहनिर्माण सोसायटी येथील एका नवविवाहितेच्या हुंडाबळीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तुषार प्रवीण डोंगरवार (३०), प्रवीण गंगाधर डोंगरवार (६३) आणि जयश्री प्रवीण डोंगरवार (५३), अशी आरोपींची नावे आहेत. माधुरी ऊर्फ तन्वी तुषार डोंगरवार, असे मृत नवविवाहितेचे नाव होते. १८ डिसेंबर २०१४ रोजी नागपुरातच माधुरीचा विवाह तुषार डोंगरवार याच्यासोबत झाला होता. माधुरी ही बी.एस्सी., बी. एड. होती. लग्नापूर्वी तुषार हा एका कंपनीत नोकरी करतो. त्याला ३५ हजार रुपये पगार आहे. त्याच्याकडे दोन आणि चारचाकी वाहने आहेत, असे आरोपींकडून सांगण्यात आले होते. लग्नात साडेपाच लाखांचे दागिने देण्यात आले होते. लग्नानंतर तुषारने माधुरीला पुणे येथे नेले होते. पुणेच्या ‘एजीईआयएस इंडिया’ येथे नोकरीस असल्याचे त्याने सांगितले होते. प्रत्यक्षात तुषार हा नोकरी करीत नसल्याचे माधुरीच्या लक्षात आले होते. ती एफडी आणि आरडीतून आपला खर्च भागवीत होती. तुषार हा तिला मारहाण करून तिचा छळ करीत होता. आपला खर्च भागविण्यासाठी तो माधुरीच्या एटीएम कार्डचा वापर करीत होता. तिचे दागिनेही त्याने गहाण ठेवले होते. छळामुळे तिचा गर्भपातही झाला होता. माधुरीने फेअरडील पब्लिकेशन कंपनीत नोकरी सुरू केली होती. तिला एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे पाठवण्यात आले होते. परंतु आठवडाभरातच तुषारने तिला पुणे येथे नेले होते. त्यानंतर ती अशक्तपणामुळे नागपुरात आली होती. तिने होणाऱ्या छळाबाबत आपल्या नातेवाईकांना सांगितले होते. सासरची सर्व मंडळी नागपुरात असताना २३ आॅक्टोबर २०१५ रोजी हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केली होती. माधुरीची बहीण मोहिनी ऊर्फ आदिती अमित पळधीकर हिच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी या तिघांविरुद्ध भादंविच्या ३०४ -ब, ४९८ - ए, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरण गंभीर असल्याने आरोपींची पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याने न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. (प्रतिनिधी)