मेटल कंपनीतील लोखंडी प्लेट चोरी करणारे तीघे गजाआड

By दयानंद पाईकराव | Updated: June 29, 2024 16:40 IST2024-06-29T16:36:06+5:302024-06-29T16:40:42+5:30

सुरक्षा रक्षक फरार : एमआयडीसी पोलिसांची कारवाई

Three accused of stealing iron plates from a metal company | मेटल कंपनीतील लोखंडी प्लेट चोरी करणारे तीघे गजाआड

Three accused of stealing iron plates from a metal company arrested

नागपूर : मेटल कंपनीतील १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट चोरी करणाऱ्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले असून कंपनीचा सुरक्षा रक्षक अद्यापही फरार आहे. ही घटना बुधवारी १९ जून २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता घडली होती.

राजेश भास्कर कडु (५१, रा. अमर संजय सोसायटी मनिषनगर) हे एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत मेटल फॅब हायटेक प्रा. लिमिटेड कंपनीत लोखंडी फॅब्रिकेशन वर्क करतात. ते लोखंडी प्लेट पाहण्यासाठी गेले असता त्यांना प्लेट ठेवलेल्या ठिकाणी आढळल्या नाहीत. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता कंपनीचा सुरक्षा रक्षक शितल तुरकर (२६, रा. गोंदिया), प्रविण माणिक मेश्राम (४२, रा. सोनबानगर खडगाव रोड, वाडी), प्रज्वल शांताराम वागडे (१९, रा. गणेशनगर दाभा) आणि दिपक शिवकुमार प्रजापती (२०, रा. वडधामना दवलामेटी, वाडी) हे सुरक्षा रक्षकाच्या मदतीने गेटमधुन एक मालवाहु गाडी कंपनीत आणून कंपनीतील क्रेनच्या साह्याने लोखंडी प्लेट चोरून नेताना दिसले. या प्रकरणी कडु यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज सयाम यांनी आरोपींविरुद्ध कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी प्रविण मेश्राम, प्रज्वल वागडे, दिपक प्रजापती यांना अटक केली असून फरार असलेला सुरक्षा रक्षक शितल तुरकर याचा शोध सुरु केला आहे.
 

Web Title: Three accused of stealing iron plates from a metal company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.