शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात

By admin | Updated: November 30, 2015 02:37 IST

अधिग्रहण करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे राज्यातील सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात आहेत.

अधिग्रहणाची दिरंगाई भोवतेय : शासनाने वेळीच सावध होणे आवश्यकराकेश घानोडे  नागपूर अधिग्रहण करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे राज्यातील सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित जमिनी धोक्यात आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यानुसार आतापर्यंत अनेक सार्वजनिक जमिनींचे आरक्षण रद्द झाले असून अनेक जमिनींचे आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी शासनाने वेळीच सावध होऊन अधिग्रहणाची कारवाई तातडीने पूर्ण करणे आवश्यक झाले आहे.महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा-१९६६ मधील कलम १२७ अनुसार सार्वजनिक उद्देशाकरिता आरक्षित जमिनीचे अंतिम विकास आराखडा अंमलात आल्यापासून १० वर्षांच्या आत अधिग्रहण करणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षण रद्द होते. परंतु, जमीन मालकाला मोबदला देण्यासाठी निधी मिळाला नसल्याने किंवा निधी मिळूनही संबंधित रक्कम मूळ मालकाला मोबदला न देता दुसऱ्याच कामासाठी उपयोगात आणल्यामुळे राज्यात सार्वजनिक उद्देशाकरिता आरक्षित अनेक जमिनींचे अधिग्रहणच करण्यात आलेले नाही. यामुळे अंतिम विकास आराखडा अंमलात आल्यापासून १० वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर जमीन मालक आरक्षण रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करीत आहेत. आतापर्यंत अनेक जमीन मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून दिलासा मिळविला आहे. तसेच, पुन्हा अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. काय म्हणते कलम १२७महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यांतर्गत कोणत्याही उद्देशासाठी आरक्षित, वितरित किंवा निश्चित केलेली जमीन अंतिम प्रादेशिक आराखडा किंवा अंतिम विकास आराखडा अंमलात आल्यापासून १० वर्षांच्या आत करार करून अधिग्रहित केली नाही किंवा या कालावधीत नगररचना कायदा किंवा जमीन अधिग्रहण कायदा-१८९४ अंतर्गत अधिग्रहणाची कार्यवाही सुरू झाली नाही, तर मालक किंवा जमिनीत रुची ठेवणारी व्यक्ती संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात नोटीस पाठवू शकते. यानंतर नोटीस मिळाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जमीन अधिग्रहित करण्यात आली नाही किंवा अधिग्रहणासाठी कोणतीही पावले उचलवण्यात आली नाहीत तर जमिनीचे आरक्षण किंवा वाटप रद्द झाले असे गृहित धरले जाईल. ही जमीन संबंधित मालकाला विकासाकरिता उपलब्ध करून दिली जाईल.हायकोर्टाने घेतली दखल आरक्षण रद्द करण्यासाठी आतापर्यंत अनेक जमीन मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे सार्वजनिक भूखंडांचे आरक्षण रद्द होत आहे ही बाब गंभीरतेने घेऊन न्यायालयाने याविषयी स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. शासनाने गेल्यावर्षीपासून याविषयी न्यायालयात भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे न्यायालयाने शासनाला उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून येत्या १० डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. सार्वजनिक उद्देशाकरिता आरक्षित जमिनीचे आरक्षण रद्द होऊ नये यासाठी काय कारवाई करण्यात आली आहे किंवा काय कारवाई करणे प्रस्तावित आहे आणि सार्वजनिक उद्देशाकरिता आरक्षित जमिनीचा मोबदला देण्यासाकरिता पुरेसा निधी मिळाल्यानंतरही संबंधित रकमेतून मोबदला न देता ही रक्कम दुसऱ्याच कामासाठी उपयोगात आणली जात आहे काय अशी विचारणा न्यायालयाने शासनास केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘गिरनार ट्रेडर्स वि. महाराष्ट्र शासन’ प्रकरणामध्ये निर्णय देताना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्याच्या कलम १२७ अंतर्गत नोटीस मिळाल्यानंतरही अधिग्रहणासाठी काहीच पावले उचलण्यात आली नाहीत तर जमीन आरक्षणमुक्त समजण्यात यावी, असा खुलासा केलेला आहे.