शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

हजारोंनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

By admin | Updated: May 22, 2016 02:56 IST

नागपूरचे खासदार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त

भाजपचे आरोग्य महाशिबिर : दक्षिण-पश्चिम नागपुरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर : नागपूरचे खासदार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राच्यावतीने दीक्षाभूमी येथील बी.आर.ए. मुंडले स्कूल येथे आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, मुख्य संयोजक संदीप जोशी, ेसहसंयोजक प्रकाश भोयर, गोपाल बोहरे प्रामुख्याने उपस्थित होते. हे आरोग्य शिबिर २६ मे पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. २७ मे रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजतापर्यंत चालेल. शिबिरात मेडिकलसह खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात आली आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर आणण्यात आले आहे. या शिबिराला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरासाठी यापूर्वीच ६ हजार नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यामुळे शिबिरासाठी चांगलीच गर्दी होती. वेळेवेर नोंदणी करण्याची व्यवस्थाही होती. प्रत्येक रुग्णांची संपूर्ण माहिती संगणकावर अपलोड केली जात आहे. प्रत्येकाची एक स्वतंत्र फाईल तयार करण्यात येत आहे. तपासणीकरिता प्रत्येक आजाराकरिता स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली होती. अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूरोग, बाळरोग विभाग, स्त्रीरोग विभाग आदींचे स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्य निसवाडे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची चमू स्वत: या शिबिरावर लक्ष ठेवून आहेत. यावेळी प्रा. राजीव हडप, विवेक तरासे, रमेश सिंगारे, मुन्ना यादव, अविनाश ठाकरे, किशोर वानखेडे, आशिष पाठक, सचिन कराळकर, श्रीपाद बोरीकर, सुरेंद्र पांडे, यांच्यासह नगरसेवक, भाजपचे बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.