शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा परवान्याच्या मुदतीत तिसऱ्यांदा वाढ

By admin | Updated: November 13, 2015 02:54 IST

राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणास्तव परिवहन विभागाने रद्द केले होते. आता या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

परवाना नूतनीकरणाला अत्यल्प प्रतिसाद : शेवटची तारीख ३० नोव्हेंबरनागपूर : राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणास्तव परिवहन विभागाने रद्द केले होते. आता या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने अंतिम मुदतीत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. आता शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. राज्यात सद्यस्थितीत ७ लाख २६ हजार आॅटोरिक्षा परवाने आहेत. यातील १ लाख ४० हजार ६५ आॅटोरिक्षांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले आहेत. त्यांच्या नूतनीकरणाचा आग्रह आॅटोरिक्षा चालक संघटनांनी धरला होता. अखेर परिवहन विभागाने आपले जुने आदेश मागे घेत परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे नवे आदेश काढले. परवाना नूतनीकरणाची शेवटची मुदत ३१ आॅक्टोबर देण्यात आली होती; नंतर ती वाढवून १६ नोव्हेंबर २०१५ करण्यात आली आहे. यादरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांवर जप्तीची मोहिमही सुरू केली, तरीही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने तिसऱ्यांदा परिवहन विभागाने अंतिम मुदतीत वाढ केली. आता ती ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केले नाही तर त्यांचे परवाने कायमचे रद्द होणार आहेत. (प्रतिनिधी)