कुटुंबियांसह कार्यक्रमाला गेले, चोरट्याने रोख, दागिने पळवून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 14:31 IST2023-03-20T14:30:47+5:302023-03-20T14:31:21+5:30

पारडी पोलिसांत गुन्हा दाखल

thief took away cash, jewellery worth 74 thousand by breaking house in nagpur | कुटुंबियांसह कार्यक्रमाला गेले, चोरट्याने रोख, दागिने पळवून नेले

कुटुंबियांसह कार्यक्रमाला गेले, चोरट्याने रोख, दागिने पळवून नेले

नागपूर : कुटुंबीयांसह कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख आणि सोन्याचांदीचे दागीने असा एकुण ८४५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजताच्या सुमारास नागेश्वरनगरात घडली.

ओमकार मनोहर कुमरे (३५, गृहलक्ष्मी सोसायटी, नागेश्वरनगर) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह नंदनवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीचे कुलुप तोडून ५० हजार रुपये रोख आणि सोन्याचांदीचे दागीने असा एकुण ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरु केला आहे.

Web Title: thief took away cash, jewellery worth 74 thousand by breaking house in nagpur