ब्रेकअप केलं, इंग्लंडला गेली.. त्यानंतर मित्राने केलेल्या एका कृत्याने तिचे जीवन उध्वस्त केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:48 IST2025-10-01T16:46:33+5:302025-10-01T16:48:48+5:30
Nagpur : ब्रेकअपमुळे इंग्लंडमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे फोटो पॉर्न साइटवर

They broke up, she went to England.. Then an act by a friend ruined her life.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेल्या विद्यार्थिनीचे न्यूड फोटो पॉर्न साइटवर टाकून तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सक्करदरा पोलिसांनी आरोपी पलाश अशोक शामकुळे (२४, खामला) याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पीडित २३ वर्षीय विद्यार्थिनी २०२० मध्ये बारावीमध्ये शिक्षण घेत असताना, तिची पलाशसोबत मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या काळात विद्यार्थिनीने पलाशच्या बहकाव्यात येऊन त्याला व्हॉट्सअॅपवर स्वतःचे न्यूड फोटो पाठवले होते. दरम्यान विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. कुटुंबीयांच्या समजावण्यावरून विद्यार्थिनीने पलाशपासून अंतर ठेवले. या ब्रेकअपमुळे पलाश संतप्त झाला. त्याने जून २०२४ दरम्यान विद्यार्थिनीला एका इंस्टाग्राम आयडीवरून तिचे न्यूड फोटो पाठवले गेले.
त्यानंतर विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. मात्र, २५ फेब्रुवारीला पुन्हा एकदा तिचे न्यूड फोटो व्हायरल झाले. त्यानंतर विद्यार्थिनीने इंग्लंडमधील मिडलँड पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार नोंदवली. वारंवार न्यूड फोटो व्हायरल झाल्याने विद्यार्थिनी त्रस्त झाली. तिने हे फोटो केवळ पलाशलाच दिले होते. पलाशच विविध पॉर्न साइट्स आणि आयडीवरून हे फोटो व्हायरल करून तिची बदनामी करत असल्याचे उघड झाले. याची माहिती मिळाल्यावर विद्यार्थिनीने आईला सर्व आपबीती सांगितली.