शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरीसाठी ‘सिंगल विंडो’ असावी

By admin | Updated: September 4, 2016 02:56 IST

सरकारच्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याची बाब अनेक शासकीय कार्यालयांमध्ये उघड झाली आहे.

अध्यक्ष अनिल नायर यांची मागणी : जमिनीची किंमत कमी करामोरेश्वर मानापुरे  नागपूरसरकारच्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याची बाब अनेक शासकीय कार्यालयांमध्ये उघड झाली आहे. बिल्डरला शहरात निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारायचा असेल तर आजही महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासमध्ये त्यांची फाईल ७० टेबलांवरून पुढे सरकते. त्यामुळे अनेक प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच बंद पडतात. नागपूरचा सर्वांगीण विकास आणि बांधकाम प्रकल्पांच्या मंजुरीसाठी ‘सिंगल विंडो’ अर्थात एक खिडकी योजना असावी, अशी मागणी क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष अनिल नायर यांनी लोकमतशी बोलताना केली.मिहानमध्ये जमिनीचे दर कमी कराशासनाने एक खिडकी योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी. त्यामुळे बिल्डर्सची वेळेची आणि पैशाची बचत होईल. नायर म्हणाले, मिहानचा वेळेनुसार हवा तसा विकास झालेला नाही. पण स्थानिक नेत्यांमुळे सध्या गती आली आहे. मिहानमधीन जमिनीची किंमत एकरी ७० लाख रुपये आहे. तुलनात्मकरीत्या तेलंगाणा राज्यात विकसित जमीन १० ते १५ लाख रुपयात उपलब्ध आहे. किंमत कमी केल्यास कंपन्या येतील, शिवाय विकास आणि बिल्डर्सला चांगले दिवस येतील, असे नायर यांनी स्पष्ट केले. शहराच्या सभोवताल विकास व्हावामेट्रो रिजनअंतर्गत नागपूरच्या सभोवतालचा विकास व्हावा. त्यासाठी सरकारला पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहे. पण हा विकास सेक्टरनुसार झाल्यास तर खरे चित्र पुढे येईल. त्यामुळे शहर वाढेल आणि आर्थिक समतोल साधणे शक्य होईल, असे नायर यांनी सांगितले.पंतप्रधान योजनेत एकही प्रकल्प नाहीपंतप्रधान निवास योजनेत संपूर्ण देशात २०२२ पर्यंत २ लाख घरांची निर्मिती करायची आहे. घोषणेला एक वर्ष लोटले आहे. पण अद्याप एकाही प्रकल्पाला मंजुरी मिळालेली नाही. पण मंजुरी आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी एक खिडकी योजना महत्त्वाचा भाग ठरणार आहे. नागपुरातही लोकांनाही परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा आहे. शासनाच्या वेळखाऊ धोरणामुळे बांधकामाची गुणवत्ता तर खराब होणार नाही ना, अशी भीती आहे. ३०० चौरस फूटाचे घर ८ लाखात आणि त्यावर २.५० लाखांची सबसिडी, असे एकूण ६.५० लाख रुपये घराची किंमत आहे. ही निर्मिती भागीदारीत होणार आहे. बिल्डरला काही फायदा होईल आणि प्रकल्प मंजुरीचे शुल्क कमी राहील, तरच तो परवडणाऱ्या घरांची निर्मिती करेल. शासनाला टीडीआर द्यावा लागेल, असे नायर यांनी स्पष्ट केले.क्रेडाई नागपूर मेट्रोच्या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये रविवारी नामांकित आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर ‘पंतप्रधान निवास योजना आणि परवडणारी घरे’ यावर मार्गदर्शन करणार आहे. कदाचित त्यांच्या मार्गदर्शनानंतरच नागपूरचा विकास वेगाने होईल, असा टोला त्यांनी लगावला.