शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

तूर्त नागपूर शहरात पाणीकपात नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 9:33 PM

दिवसेंदिवस शहरातील पाणीसमस्या वाढत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. तोतलाडोहातील डेड स्टॉकमधील पाण्यात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचविण्यासाठी पुरवठ्यात कपात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु मनपातील पदाधिकारी व भाजपा नेत्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. डेड स्टॉक संपला तर दिवसाआड तर दूरच शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याचा गंभीर धोका आहे. याचा विचार करता पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय वा पाणीपुरवठ्यात कपात करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. २० जूनपर्यंत पाणीपुरवठा यथावत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पाणीटंचाईसंदर्भात सर्वच चितिंत आहेत. शहरात २००६ नंतर प्रथमच कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांसोबत मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवसेंदिवस शहरातील पाणीसमस्या वाढत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. तोतलाडोहातील डेड स्टॉकमधील पाण्यात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचविण्यासाठी पुरवठ्यात कपात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु मनपातील पदाधिकारी व भाजपा नेत्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. डेड स्टॉक संपला तर दिवसाआड तर दूरच शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याचा गंभीर धोका आहे. याचा विचार करता पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.सूत्रांच्या माहितीनुसार दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय वा पाणीपुरवठ्यात कपात करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. २० जूनपर्यंत पाणीपुरवठा यथावत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पाणीटंचाईसंदर्भात सर्वच चितिंत आहेत. शहरात २००६ नंतर प्रथमच कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.शहराच्या पाणीपुरवठ्यात सध्याच कपात केली जाणार नाही. मात्र कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहे. मान्सूनच्या आगमनावर सर्वकाही निर्भर राहणार असल्याचे बैठकीला उपस्थित जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले. पुढील काही दिवसात पाऊ स झाला तर कच्च्या पाण्याची समस्या सुटेल. तोतलाडोहातील आरक्षित डेड स्टॉकमधून जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो.जलवाहिनीसाठी सरकार ८० कोटी देणारनवेगाव खैरी प्रकल्पाचा उजवा कालवा ते कन्हान नदीतील इन्टेक वेल अशी ४४.७ कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी १७ कि.मी.पर्यंत सर्वे करण्यात आला. सध्या कालव्याव्दारे पाणी आणले जाते. जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी आणल्यास ४० एमएलडी पाण्याची बचत होईल. यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती झलके यांनी दिली. सर्वे तातडीने पूर्ण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल. प्रस्तावानुसार यासाठी राज्य सरकारकडून ८० कोटी मिळणार आहे.कन्हान येथे एक्सप्रेस फीडरकन्हान जलशुद्धिकरण केंद्राच्या ठिकाणी एक्स्प्रेस फीडर नसल्याने वीज पुरवठा वारंवार बाधित होतो. एक्स्प्रेस फीडरसाठी तीन कोटींचा खर्च असल्याची माहिती महावितरणने दिली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने १.३० कोटीत एक्स्प्रेस फीडर उभारण्याची तयारी महावितरणने दर्शविली आहे. मंगळवारी ही रक्कम महापालिका महावितरणच्या खात्यात जमा करणार आहे.

 

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका