वेटर झाला हैवान, तरुणीवर अत्याचार करत केली बेदम मारहाण

By योगेश पांडे | Updated: August 7, 2023 16:50 IST2023-08-07T16:46:17+5:302023-08-07T16:50:45+5:30

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

The waiter physically abused the young woman and beat her brutally | वेटर झाला हैवान, तरुणीवर अत्याचार करत केली बेदम मारहाण

वेटर झाला हैवान, तरुणीवर अत्याचार करत केली बेदम मारहाण

नागपूर : वासनेच्या नादात एका वेटरमध्ये अक्षरश: हैवान संचारला व अनेक दिवसांपासून अत्याचार करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण केली. त्याने तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याचीदेखील धमकी दिली आणि त्यामुळे १९ वर्षीय तरुणी मानसिक धक्क्यात गेली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अथर्व अशोक तुरकर (२१, तुमसर, भंडारा) असे आरोपीचे नाव आहे. तो नागपुरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता व त्याची एका तरुणीसोबत मैत्री झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढळे व डिसेंबर २०२० मध्ये सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी ती अल्पवयीनच होती. त्यानंतर अडीच वर्षे हा प्रकार सुरू होता. त्याने तरुणीला लग्नाचे वचन दिले होते. मात्र तिने लग्नाबाबत विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करायचा.

४ ऑगस्ट रोजी त्याने तिच्यावर परत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला नकार देत लग्नाबाबत विचारले असता तो संतापला व तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याचीदेखील धमकी दिली. या प्रकाराने हादरलेल्या तरुणीने अखेर पोलीस सदर पोलीस ठाणे गाठले व अथर्वविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे.

Web Title: The waiter physically abused the young woman and beat her brutally