राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक ! पालकांनी मुले वाढवायची की वाचवायची?

By राजेश शेगोकार | Updated: November 24, 2025 13:26 IST2025-11-24T12:46:45+5:302025-11-24T13:26:02+5:30

Nagpur : मानसिक तणावाला शब्द नसतात आणि जेव्हा तो सहनशक्तीच्या पलिकडे जातो, तेव्हा मुले कायमची गप्प होण्याचा निर्णय घेतात आणि इथेच आपण हरतो. या 'आपण'मध्ये पालक, शिक्षक व समाज याचाही समावेश होतो.

The state has the highest rate of student suicides in the country! Should parents raise or save their children? | राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक ! पालकांनी मुले वाढवायची की वाचवायची?

The state has the highest rate of student suicides in the country! Should parents raise or save their children?

राजेश शेगोकार
नागपूर :
घटना क्रमांक १: नागपुरातील चणकापूर येथील आठतीत शिकणान्या १३ तर्षीय विद्यार्थिनीने मोबाइल दिला नाही म्हणून राग आल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिव्या सुरेश कोठारे, असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नात आहे.

घटना क्रमांक २: मूलच्या सांगलीच्या असलेल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यांने दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनवर आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिड्डीत लिहून ठेवले. 

घटना क्रमांक ३: चंद्रपूरच्या जनता करिअर लॉन्चरच्या वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या प्रथमेश गुलाब चुधरी रा. धानोरी पिपरी, या विद्यार्थ्याने तसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली.

या तिन्ही घटना सरत्या आठवडचात घडल्या आहेत, यामधील स्थळ, नावे, कारणे वेगवेगळी असली तरी 'विद्यार्थी' हा समान धागा आहे. खरंतर या प्रातिनिधिक घटना आहेत. अशा घटना देशभरात रोज कुठे ना कुठे घडत असतात, ज्या वयात नवी स्वप्न पाहायची, आईवडील, शिक्षकांच्या मदतीने ती फुलवायची, त्या वयात या विद्यार्थ्यांची दिशा का चुकावी, याची चिंता नाही तर गांभीर्याने चिंतन करण्याची वेळ आली आहे.

एकीकडे या घटना घढ़त असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचा अहवाल समोर आला आहे हा अहवाल धक्कादायकच नव्हे तर आपल्या संपूर्ण व्यवस्थेतर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. दहावी व बारातीच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असणे म्हणजेच हा वयसमूह सर्वांत असुरक्षित ठरत आहे. शिक्षण, स्पर्धा आणि करिअरच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना आनंदापासून दूर आणि दडपणाखाली ढकलतोय का? आजची मुले अधिक बुद्धिमान, तंत्रज्ञाननेही आणि स्पर्धात्मक आहेत. पण, भावनिक सहनशक्ती मात्र आजही नाजूकच आहे. अपेक्षांचे ओझे, सततचे मूल्यांकन, रैंक आणि मार्कांच्या मागे सुरू झालेली शर्यत मुलांना थकवते आहे. अपयश म्हणजे आयुष्य संपले, असा चुकीचा समज त्यांच्या मनात दृढ होत आहे.

पालक, शिक्षक किंवा समाजाने दिलेल्या "परिपूर्णतेच्या मापदंडांना पोहोचता न आल्यास त्यांना स्वताचे मूल्याच कमी वाटू लागते. काही मुले सोशल मीडियाच्या आहारी जातात, अभासी जगालाच आपले विश्व समजून कतटाळतात अखेर कपाळमोक्षाशिवाय हाती काहीच लागत नाही.

मानसिक तणावाला शब्द नसतात आणि जेव्हा तो सहनशक्तीच्या पलिकडे जातो, तेव्हा मुले कायमची गप्प होण्याचा निर्णय घेतात आणि इयेच आपण हरतो. या 'आपण'मध्ये पालक, शिक्षक व समाज याचाही समावेश होतो. दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनतर आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांने तर माझे अवयवदान करा, असे लिहून ठेवले, जाताना एवढे सामाजिक भान असणारा हा मुलगा आयुष्याची लढाई नेमका हरला कुठे?

समाजानेही बदलायला हवे. यशाचे मापदंड ठरवितांना जे मागे राहिले ते नालायकच आहेत असे शिक्के मारणे थांबवले पाहिजे त्यामुळेच विद्यार्थ्यांची आत्महत्या ही केवळ एक व्यक्तिगत शोकांतिका नाही; ती संपूर्ण व्यवस्थेचा अपयशाचा पुरावा आहे. अशा घटना घडल्या की चिंतन मनन सुरू हाेते. समाजासकट सर्व व्यवस्था श्रद्धांजलीला तयारच असते पण उपायांचे काय,  आजची वेळ ही दोषारोपाची नाही; ती आत्मपरीक्षणाची आहे. मुलांचे आयुष्य, भविष्य आणि मानसिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवणे हीच आज शिक्षणक्षेत्र, कुटुंब आणि समाज पुढे असलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपण मुलांना भविष्यातील यंत्र तयार करतोय की संवेदनशील माणूस, मुलांचे मार्क वाढवायचे की त्यांना वाचवायचे निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.

Web Title : महाराष्ट्र में छात्रों की आत्महत्याएं सबसे अधिक: बच्चों को पालें या बचाएं?

Web Summary : महाराष्ट्र में छात्रों की आत्महत्याएं चिंताजनक रूप से बढ़ रही हैं। पढ़ाई का दबाव, करियर की अपेक्षाएं और सोशल मीडिया इसका कारण हैं। विशेषज्ञ माता-पिता, शिक्षकों और समाज से भावनात्मक कल्याण को प्राथमिकता देने, प्रतिस्पर्धा के बजाय लचीलापन विकसित करने का आग्रह करते हैं।

Web Title : Maharashtra leads in student suicides: Raising children or saving them?

Web Summary : Maharashtra sees alarming student suicides. Pressure from studies, career expectations, and social media contribute. Experts urge parents, educators, and society to prioritize emotional well-being, fostering resilience over relentless competition to prevent tragic losses.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.