शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

लय भारी जुगाड... ! त्याने भंगारातून बनवली चक्क ‘रेसिंग कार’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 10:57 IST

तरुण स्वप्निलचा देशी जुगाड : २६ जानेवारीला यशस्वी ट्रायल

निशांत वानखेडे/राजेश टिकलेनागपूर : बालपण संपले आणि तारुण्य सुरू झाले की अनेक आवडींपैकी कार किंवा बाईक चालविण्याची आवडही बळावत जाते. मात्र, कुणी ती स्वत: तयार करून चालविण्याचा विचार करीत नाही. स्वप्निल मात्र याला अपवाद ठरला. रेसिंग कार चालविण्याची प्रबळ इच्छा; पण ती खरेदी करणे त्याच्या क्षमतेच्या पूर्ण बाहेर. मग काय, या पठ्ठ्याने भंगार साहित्याचा देशी जुगाड करून रेसिंग कार तयार केली. २६ जानेवारीला नागपूरच्या रस्त्यावर त्याची यशस्वी ट्रायलही घेतली. 

स्वप्निल चाेपकर असे या तरुणाचे नाव. तो एमए करीत आहे. त्याचे वडील काशीनाथ चाेपकर हे बेकरीच्या मालाचे वितरण करतात, तर आई फिजिओथेरेपिस्ट आहे. स्वप्निललाही बालपणापासून माेटारसायकल, कार चालविण्याची हाैस; पण थाेडा तारुण्यात आला तेव्हा ही वाहने आपण स्वत: तयार करावी, अशी त्याची इच्छा. या इच्छेपाेटी त्याने अल्पवयात असतानापासून मिळेल त्या गॅरेजमध्ये काम करणे सुरू केले. रेसिंग कार चालविणे हे त्याचे स्वप्न हाेते; पण ती खरेदी करणे जवळजवळ अशक्य हाेते. मग त्याने भंगार साहित्यातून कारची निर्मिती सुरू केली. ८०० सीसी इंजिन, स्टिअरिंग व चाकेही मारुतीची, पॅनल इतर गाड्यांचे आणि इतर साहित्यही भंगारातून आणले.  कार तयार केली. मागील वर्षी २६ जानेवारीला ती गाडी रस्त्यावर उतरविली; पण हा प्रयत्न फसला. त्याने पुन्हा काम सुरू केले आणि दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. त्याच्या जुगाड कारने २६ किमीचा प्रवास पूर्ण केला. 

भंगारातून कार तयार करता येते; पण ती रस्त्यावर धावायलाही हवी. त्यामुळे ही कार नेहमी चालवू शकेल, अशी बनविली आहे. यानंतर आरटीओ कार्यालयात जाऊन परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशाप्रकारची निर्मिती पुढेही सुरूच ठेवणार.    - स्वप्निल चाेपकर

भारतीय रस्त्यांना अनुकूल स्टिअरिंग असलेली ही कार ताशी १४० किमी वेगाने धावू शकते. इंजिनमध्ये बदल करून वेग खऱ्या रेसिंग कारप्रमाणे करता येताे.nरेसिंग कारचा बुडाचा भाग जमिनीला लागून असताे. मात्र, स्वप्निलने रस्त्यावरील खड्डे, ब्रेकर्स सहज ओलांडून जाईल अशी उंच कार बनविली आहे.nकारला सव्वा लाख रुपये खर्च आला. ही कार १६ ते १७ किमी/लिटरचा मायलेज देते.

 

टॅग्स :carकारnagpurनागपूरtechnologyतंत्रज्ञान