शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजाराचा वाढतोय विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:07 IST

नागपुरात सुमारे ५० हजारांवर रुग्ण : मेयोच्या मनोविकृती शास्त्र विभागाचे सर्वेक्षण

सुमेध वाघमारे

नागपूर : सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाईल मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागात उपचारासाठी रोज येणाऱ्या साधारण २०० रुग्णांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. या विभागाने मागे केलेल्या एका सर्वेक्षणात, नागपुरात साडेसहा तास व त्यापेक्षा जास्त मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले. यावरून शहरात सुमारे ५० हजार ते एक लाख लोक या व्यसनात आकंठ बुडाले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला. धक्कादायक म्हणजे, यातील बहुसंख्य लोकांना मोबाईलमुळे मानसिक आजाराकडे आपली वाटचाल होत असल्याचे ध्यानीमनीही नाही. यामुळे ते आणखी धोकादायक ठरत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मोबाईलच्या गरजेचं रूपांतर व्यसनात होऊ लागले आहे. लहानांना त्याची सवय तर तरुण पिढीवर त्याचे थेट दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. मेयोच्या मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, मनोविकारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मोबाईलचा अतिवापर हे एक कारण प्रकर्षाने दिसून येत आहे. मेयो रुग्णालयाच्यावतीने मोबाईलच्या अतिवापराला घेऊन एका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १८ ते २० वयोगटातील १०० मुलांवर नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यात सर्वच मुलांनी दिवसाच्या साडेसहापेक्षा जास्त तास मोबाईलवर घालवीत असल्याचे, तर काहींनी १२ ते १४ तास वापर करीत असल्याचे सांगितले.

- या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर व्यसन

तुम्ही तुमच्या झोपेच्यावेळही रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत असाल, घरातील किंवा कार्यालयातील लोक तुमच्या मोबाईलच्या वापराला घेऊन चिडत असतील, मोबाईलचा वापर लपविण्याचा तुम्ही प्रयत्न करीत असाल, मोबाईल सोडून दुसऱ्या कुठल्याही कामात मन लागत नसेल तर तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागले आहे, असा त्याचा समज असल्याचे डॉ. सोमानी यांनी सांगितले.

- मोबाईल आजाराची लक्षणे

मोबाईलचा वापर दरदिवसाला वाढणे, वापर न केल्यास अस्वस्थता वाटणे, मोबाईल वाजल्याचा सतत भास होणे.

मोबाईलवर सतत गेम खेळणे, सेल्फी घेण्याचा नाद निर्माण होणे, मोबाईल हातात नसताना बोटाच्या हालचाली होणे, मोबाईल जवळ नसला तरी तो वाजल्याचा आवाज येणे ही मोबाईलच्या आजाराची लक्षणे आहे. यातून पुढे छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन ताण निर्माण होऊन नैराश्य येऊ शकते.

- काय करावे

डॉ. सोमानी म्हणाले, मोबाईलचा अतिवापर कमी करण्यासाठी काही असे ठिकाण ठरवावे जिथे मोबाईलचा वापर करू नये, जसे सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करताना किंवा ‘जिम’ला जाताना मोबाईल सोबत घेऊन जाऊ नये. जेवताना मोबाईलचा वापर करू नये. झोपताना मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा. कुटुंबासोबत फिरायला गेले असताना मोबाईलचा कमीतकमी वापर करावा, मोबाईलमध्ये असे काही ॲप्स टाकावे ज्यामध्ये कोणते ॲप्स कितीवेळ पाहावे ते सांगते, आदींचा फायदा होतो.

टॅग्स :Healthआरोग्यMobileमोबाइलMental Health Tipsमानसिक आरोग्य