लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढते वायू प्रदूषण, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती आणि पर्यावरणपूरक पर्यायांची वाढती जाणीव यामुळे नागपूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सध्या तब्बल ४९,५६५ ई-वाहने रस्त्यांवर धावत असून, या वाढत्या प्रवाहाला बळ देण्यासाठी महावितरणने ३०७ सार्वजनिक ई-चार्जिंग स्टेशन्सचे मजबूत जाळे उभे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ई-प्रवास अधिक विश्वासार्ह आणि सुलभ बनला आहे.
महावितरणला राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ‘नोडल एजन्सी’ म्हणून जबाबदारी दिली आहे. नागपूरसह राज्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण कमी करणे आणि ई-वाहनांचा वापर वाढवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी प्राधान्याने वीजजोडणी देण्याबरोबरच खासगी उद्योजकांनाही या क्षेत्रात उतरवण्यासाठी महावितरणकडून तांत्रिक सहकार्य दिले जात आहे.
घरगुती वीजपुरवठ्यावर वाहन चार्जिंग शक्य असले तरी लांब पल्ल्याच्या प्रवासात किंवा तातडीच्या प्रसंगी फास्ट चार्जिंग स्टेशनची गरज महत्त्वाची ठरते. ही गरज लक्षात घेऊन शहरापासून ग्रामीण भागापर्यंत चार्जिंग पॉइंट्सचे जाळे विस्तारण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यात वाढते ई-वाहनांचे प्रमाण आणि चार्जिंग सुविधांचे विस्तारलेले जाळे पाहता, शहर ‘ग्रीन मोबिलिटी’च्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
विभागनिहाय चार्जिंग स्टेशनची संख्या
नागपूर शहर :महाल - ८४काँग्रेस नगर - ६६सिव्हिल लाइन्स - ४५बुटीबोरी - ४०गांधीबाग - ७
नागपूर ग्रामीण- मौदा -२६- सावनेर - १६- काटोल- ७-उमरेड - ६
‘पॉवरअप ईव्ही’ ॲप ठरणार चालकांचा साथीदार
ई-वाहनधारकांना आता जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी भटकंती करण्याची गरज उरलेली नाही. महावितरणच्या ‘पॉवरअप ईव्ही’ मोबाइल ॲपच्या मदतीने चालकांना नकाशावर जवळचे स्टेशन सहज शोधता येते. याशिवाय स्लॉट बुकिंग, उपलब्धता तपासणी आणि सुलभ चार्जिंग या सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने ई-वाहनांचा वापर अधिक सोयीस्कर होत आहे.
Web Summary : Nagpur sees rapid adoption of EVs due to pollution concerns and rising fuel costs. Over 49,000 EVs are on roads, supported by 307 charging stations. MSEDCL facilitates charging infrastructure, promoting green mobility with its 'PowerUp EV' app for easy station locating and booking.
Web Summary : प्रदूषण की चिंता और ईंधन की बढ़ती लागत के कारण नागपुर में ईवी तेजी से अपनाए जा रहे हैं। 49,000 से अधिक ईवी सड़कों पर हैं, जिन्हें 307 चार्जिंग स्टेशनों का समर्थन प्राप्त है। MSEDCL चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर को सुविधाजनक बनाता है, और स्टेशन ढूंढने और बुकिंग के लिए अपने 'PowerUp EV' ऐप के साथ हरित गतिशीलता को बढ़ावा देता है।