शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

'थ्री-रोबोट' असलेले मेडिकल ठरणार देशातील पहिले रुग्णालय; पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही

By सुमेध वाघमार | Updated: March 27, 2026 20:16 IST

Nagpur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण आहे. या संस्थेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी आणि जगात उपलब्ध असलेले सर्व प्रगत वैद्यकीय संशोधन येथे आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सुमेध वाघमारे 
नागपूर:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण आहे. या संस्थेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी आणि जगात उपलब्ध असलेले सर्व प्रगत वैद्यकीय संशोधन येथे आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 'मेडिकल'मध्ये नुकतेच पहिले रोबोटिक तंत्रज्ञान सेवेत दाखल झाले असून, येत्या दोन वर्षांत आणखी दोन अत्याधुनिक रोबोट्स उपलब्ध करून दिले जातील. यासह एकूण ३ रोबोट्सच्या मदतीने प्रगत शस्त्रक्रिया करणारे नागपूरचे 'मेडिकल' हे देशातील पहिले शासकीय रुग्णालय ठरेल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (जीएमसी) ७९ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी जीएमसीच्या सभागृहात उत्साहात पार पडला. याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंचावर  मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, डॉ. उदय नारलावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुषमा ठाकरे यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. वाय.एस. देशपांडे व सचिव डॉ. सुधीर नेरळ उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व सचिवांसह सर्व पदाधिकाºयांनी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पदभार स्विकारला. कार्यक्रमात पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता यांचा सत्कार करून त्यांच्या ‘डिजीटल कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी केले. संचालन हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुनील वाशिमकर व डॉ. प्रगती राठोड यांनी तर आभार डॉ. नेरळ यांनी मानले.

विकसित भारताची पिढी नागपुरात घडतेय

पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, मेडिकल कॉलेजची उंची आज संपूर्ण देशात आणि जगात पोहोचली आहे. २०४७ च्या 'विकसित भारता'साठी उत्कृष्ट मानवी संसाधनाची गरज असून, 'मेडिकल' ती पिढी घडवत असल्याचा अभिमान आहे. इथून शिक्षण घेतलेले डॉक्टर आज जगभरातील अनेक देशांत उच्च पदांवर रुग्णसेवा देत आहेत. केवळ वैद्यकीय पदवीपेक्षा नागपूर मेडिकलचा विद्यार्थी असण्याला आज जागतिक स्तरावर एक वेगळे महत्त्व आणि मोठा विश्वास प्राप्त झाला आहे. समाजात डॉक्टर हा सर्वात विश्वासार्ह घटक असल्याचे नमूद करत बावनकुळे म्हणाले, याच विश्वासापोटी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील कानाकोपºयातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.

ग्रामीण आरोग्य व्यवस्था तातडीने सक्षम करा-न्यायमूर्ती किलोर

व्यक्ती शिक्षक, वकील किंवा अभियंत्याशिवाय जगू शकेल, पण डॉक्टराविना नाही. या जगात आपले स्वागत करणारा पहिला स्पर्श आणि जगाचा निरोप घेतानाचा शेवटचा स्पर्श हा डॉक्टरचाच असतो, अशा भावूक शब्दांत न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव केला.  यावेळी  'जीएमसी'च्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, या संस्थेने स्वत:ची ओळख केवळ एक रुग्णालय न ठेवता गरिबांच्या 'भरवशाचे ठिकाण' अशी बनवली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यांचे लक्ष वेधत न्यायमूर्ती किलोर यांनी गाव-खेड्यांमधील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव मांडले. शहरांमध्ये आजारांचे लवकर निदान होते, पण ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आजही अपुºया सुविधा, उपकरणांचा अभाव आणि कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे संघर्ष करत आहेत. खºया अर्थाने निरोगी भारत घडवायचा असेल, तर तळागाळातील शेवटच्या माणसाला वेळेवर निदान आणि उपचाराचा अधिकार मिळायलाच हवा. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे तातडीने अद्ययावत करण्याची गरज आहे, असे मत मांडले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Medical to be First Hospital in India with Three Robots

Web Summary : Nagpur's Government Medical College will be India's first public hospital using three robots for advanced surgeries. Guardian Minister Bawankule announced the initiative during GMC's anniversary, emphasizing the institution's vital role in healthcare and commitment to advanced technology for serving the underprivileged.
टॅग्स :nagpurनागपूरChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे