योगप्रकाशच्या संकल्पपूर्तीचा कृतज्ञता सोहळा

By Admin | Updated: May 19, 2014 00:45 IST2014-05-19T00:45:39+5:302014-05-19T00:45:39+5:30

व्रतस्थ योगी जनार्दनस्वामी यांच्या समाराधना महोत्सवानिमित्त योगसाधकांनी संकल्प केला. जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगरच्यावतीने योगप्रकाश हे योगाला वाहिलेले मासिक प्रकाशित करण्यात येते.

Thanksgiving ceremony for Yoga Prakash | योगप्रकाशच्या संकल्पपूर्तीचा कृतज्ञता सोहळा

योगप्रकाशच्या संकल्पपूर्तीचा कृतज्ञता सोहळा

 नागपूर : व्रतस्थ योगी जनार्दनस्वामी यांच्या समाराधना महोत्सवानिमित्त योगसाधकांनी संकल्प केला. जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगरच्यावतीने योगप्रकाश हे योगाला वाहिलेले मासिक प्रकाशित करण्यात येते. या मासिकाचे १० हजार वर्गणीदार करण्याचा हा संकल्प गेल्या वर्षभरापूर्वी योगसाधकांनी केला. स्वामींच्या समाराधनादिनापर्यंत हे लक्ष्य पूर्ण करायचे ठरविण्यात आले. स्वामींचा समाराधना दिन २५ मे रोजी आहे. पण त्यापूर्वीच स्वामींच्या आशीर्वादाने १० हजाराच्या वर वर्गणीदार करण्यात साधकांना यश आले. त्यानिमित्त सर्व साधकांनी एकत्र येत एक अनोखा सोहळा रामनगरच्या केंद्रात आयोजित केला होता. याप्रसंगी ९९९१ ते १० हजार या १० वर्गणीदारांना प्रतिकात्मक पद्धतीने योगप्रकाशचा अंक टपालाद्वारे पाठवण्यात आला. त्यावर वर्गणीदारांची नावे व पत्ता अतिथींच्या हस्ते टाकण्यात आला. योगजीवन शैलीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे मासिक प्रकाशित करण्यात येते. १९८२ पासून या मासिकाचे प्रकाशन करण्यात येते. या मासिकातील योगविषयक माहितीमुळे आतापर्यंत हजारो नागरिकांचे आरोग्य योगसाधनेने सुधरले आहे. पण आर्थिक कारणाने योगप्रकाशच्या प्रकाशनात सातत्य ठेवण्यात अनंत अडचणी येत होत्या. पण स्वामींच्या समाराधनादिन उत्सवात ५०० योगसाधकांनी योगप्रकाशचे १० हजार सदस्य करण्याचा संकल्प केला आणि एका वर्षात हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. त्याचा आनंद आणि समाधान आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहर्‍यावर होते. या कार्यक्रमाला रामकृष्ण मठाचे स्वामी ब्रह्मस्थानंद, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, लक्ष्मणराव जोशी, माणिकलाल सोनी, गजानन निमदेव, शैलेश पांडे, अतुल पांडे, दिवेकर, रामभाऊ खांडवे, गि.गो. मोडक, संपादक डॉ. विश्वेश्वर सावदेकर प्रामुख्याने उपस्थित होते. स्वामींच्या समाधीस्थळी प्रसन्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा संकल्पपूर्तीचा सोहळा समाधान देणारा होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गि.गो. मोडक यांनी केले. रामभाऊंनी स्वामींच्या कार्याची ओळख करून दिली. योगप्रकाशची माहिती डॉ. सावदेकर यांनी दिली. संचालन वर्षा क्षीरसागर यांनी केले. याप्रसंगी स्वामी ब्रह्मस्थानंद यांनी योगप्रकाश मासिकाला व सर्व योगसाधकांना शुभेच्छा दिल्या. यानंतर योगप्रकाशचे ५० हजार सदस्य करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व केंद्राचे योगसाधक प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी

Web Title: Thanksgiving ceremony for Yoga Prakash