शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता

By admin | Updated: August 3, 2015 02:51 IST

भद्रावतीचे ठाणेदार अशोक साखरकर एपीआयसह लाच घेताना सापडल्याने पोलीस विभाग हादरला आहे.

एसीबीने आपल्याच अधिकाऱ्यावर केली कारवाई नागपूर : भद्रावतीचे ठाणेदार अशोक साखरकर एपीआयसह लाच घेताना सापडल्याने पोलीस विभाग हादरला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक दिवसानंतर त्यांच्याच विभागात तैनात असलेल्या एखाद्या अधिकाऱ्याला याप्रकारे लाच घेताना पकडले. अवैध वाहतुकीच्या मासिक हप्त्याची रक्कम १० हजाराहून ३५ हजार रुपये केल्यामुळे साखरकरला तुरुंगात जाण्याची वेळ आली. रेती वाहतूक करणारा आकाश वानखेडे यांच्या तक्रारीवरून एसीबीने साखरकर आणि त्याचा सहायक निरीक्षक शंकर चौधरी याला २० हजार रुपयाची लाच घेतांना पकडले आहे. साखरकर पूर्वी एसीबीमध्ये तैनात होते. सूत्रानुसार दीड वर्षांपूर्वी एसीबीमधून चंद्रपुरात बदली झाली होती. पहिले सिंदेवाही ठाण्यात तैनात होते. काही दिवसांपूर्वीच ते भद्रावती येथे बदलून आले होते. तक्रारकर्ता आकाश वानखेडे याचे तीन ते चार ट्रक आणि टिप्पर आहेत. तो पूर्वीच्या ठाणेदाराला रेती वाहतुकीच्या मोबदल्यात १० हजार रुपये देत होता. साखरकरने त्याला ३५ हजार रुपयांची मागणी केली. तीनपट अधिक रक्कम लाच देणे वानखेडेला शक्य नव्हते. साखरकर त्यापेक्षा कमी रक्कम घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे वानखेडेचा व्यापारही प्रभावित होऊ लागला होता. मासिक हप्ता न देऊ शकल्याने वानखेडेने वाहतूकही कमी केली होती. ५ जुलै रोजी साखरकरच्या आदेशानुसार एपीआय चौधरीने वानखेडेचे वडील आणि वाहन चालकाला अवैध वाहतूक करतांना पकडले. तेव्हापासून साखरकर ३५ हजार रुपयाच्या हप्त्यासाठी तगादा लावू लागत होता. (प्रतिनिधी)