शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईकरांच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक

By admin | Updated: December 4, 2015 03:05 IST

तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नई व उत्तर तामिळनाडूमध्ये अक्षरश: आणीबाणी निर्माण झाली आहे.

सेवा भारतीचा पुढाकार : देशभरातून मदतीचे आवाहनयोगेश पांडे नागपूर तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नई व उत्तर तामिळनाडूमध्ये अक्षरश: आणीबाणी निर्माण झाली आहे. शासकीय पातळीवर येथे नागरिकांना मदत केली जात असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीदेखील तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. सेवा भारती या संघ परिवारातील संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे काम सुरू झाले असून देशभरातील अनेक स्वयंसेवक अन्न, औषधे व कपडे घेऊन चेन्नईकडे रवाना झाले आहेत. दोन दिवस झालेल्या अभूतपूर्व पावसाने चेन्नईतील जनजीवन कल्पनातीत पद्धतीने विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज, मोबाईल नेटवर्क, एटीएम, बँकसेवा बंद असून असून पिण्याचे पाणी व अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत तातडीने संघाचे स्वयंसेवक धावून गेले असल्याची माहिती संघ मुख्यालयातील सूत्रांनी दिली आहे. साचलेल्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्न, पाणी तसेच औषधांची पाकिटे पोहोचविली जात आहेत. शिवाय तामिळनाडूच्या निरनिराळ्या भागांत हजारांहून अधिक स्वयंसेवक निरनिराळे गट पाडून पडेल ती कामे करीत आहेत. स्वयंसेवकांनी घरातून पाणी बाजूला सारण्यापासून ते तात्पुरते निवारे उभारण्यापर्यंतची कामे प्रारंभ केली आहेत. शिवाय पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याची निगा राखण्याचे कार्यदेखील हाती घेतले आहे. देशभरातून स्वयंसेवकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूरग्रस्त नागरिकांच्या खाण्यापिण्याची आणि निवासाची योग्य व्यवस्था होईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तेथे कार्य करीत राहणार आहेत, अशी माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.ग्रामीण भागांतदेखील पूरग्रस्तांना हातचेन्नईच्या जवळपासच्या ग्रामीण परिसरात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसोबत संघाचे स्वयंसेवकदेखील मदत व पुनर्वसन कार्यात लागले आहेत. कांचीपुरम, तिरवल्लूर व कुड्डलूर जिल्ह्यांमध्येही पावसाने कहर केला आहे. गुरुवारी कुडुलूरमध्ये तीन हजार, मडिपक्कम येथे हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत अन्नाची पाकिटे पोहोचविण्यात आली. याशिवाय वेल्लोर जिल्ह्यातून ग्रामीण भागासाठी मदतीचे ट्रक रवाना झाले आहेत. चेन्नईत १५ हजारांहून अधिक नागरिकांना अन्न, पाणी व औषधांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.