शालार्थ आयडी घोटाळ्यात आरोपी शिक्षकांचे आंदोलन ! वेतन बंद केल्यामुळे नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 20:33 IST2025-11-18T20:31:18+5:302025-11-18T20:33:07+5:30
Nagpur : घोटाळा उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्यातील आरोपी शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आले आहे ज्यामुळे त्रस्त शिक्षकांनी न्यायालयात देखील धाव घेतली.

Teachers accused in Shalarth ID scam protest! Upset over salary suspension
नागपूर :शिक्षण क्षेत्रात झालेल्या शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी शिक्षकांचे वेतन बंद केल्यामुळे शिक्षकांनी धंतोली येथील उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार दोषी शिक्षकांवर कारवाई व्हावी पण निर्दोष शिक्षकांचे वेतन लवकरात लवकर व्हायला हवे.
या घोटाळ्यात २०१९ ते २०२५ दरम्यान झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या खोटी कागदपत्रांच्या आधारे झाल्या. शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्थेचे संचालक यांनी नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार करून अपात्र शिक्षकांना नियुक्त केले आणि करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आले असून सध्या एसआयटी चौकशी करत आहे.
घोटाळा उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्यातील आरोपी शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आले आहे ज्यामुळे त्रस्त शिक्षकांनी न्यायालयात देखील धाव घेतली. सोमवारी केलेल्या आंदोलनात शिक्षकांनी त्यांचे वेतन पुन्हा लागू करण्याची मागणी केली.