शिक्षकांनी घेतला मेट्रो जॉय राईडचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:35 IST2018-09-04T22:34:59+5:302018-09-04T22:35:56+5:30
शिक्षक दिनाच्या औचित्याने नागपूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांकरिता मेट्रो ‘जॉय राईड’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर, ग्रामीण व जिल्हा परिषद विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. जॉय राईडदरम्यान शिक्षकांमध्ये उत्साह होता. यावेळी आ. नागो गाणार प्रामुख्याने उपस्थित होते. जॉय राईडमध्ये शहर व ग्रामीण भागातील २०० हून अधिक शिक्षकांनी भाग घेतला. शिक्षक दिवस दरवर्षी ५ सप्टेंबरला साजरा केला जातो.

शिक्षकांनी घेतला मेट्रो जॉय राईडचा आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षक दिनाच्या औचित्याने नागपूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांकरितामेट्रो ‘जॉय राईड’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर, ग्रामीण व जिल्हा परिषद विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. जॉय राईडदरम्यान शिक्षकांमध्ये उत्साह होता. यावेळी आ. नागो गाणार प्रामुख्याने उपस्थित होते. जॉय राईडमध्ये शहर व ग्रामीण भागातील २०० हून अधिक शिक्षकांनी भाग घेतला. शिक्षक दिवस दरवर्षी ५ सप्टेंबरला साजरा केला जातो.
मेट्रोचे काम जागतिक दर्जाचे आहे. भविष्यात नागपूर मेट्रो नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त व सोयीस्कर ठरणार असल्याने ते सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे सर्वांनी मेट्रोचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे मत शिक्षक मतदारसंघाचे आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले. जॉय राईडमध्ये उपस्थित शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत व डोक्यावर फेटे घालून शिक्षक दिवस साजरा केला. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा जेणेकरून प्रदूषणावर आळा घालण्यास मदत होईल, यात नागपूर मेट्रो सर्वांत चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगतिले. सर्व पालकांनी मुलांसह भविष्यात मेट्रोने प्रवास करावा, असा संदेश ही यावेळी शिक्षकांनी पालकांना दिला.
सकाळी ९ वाजता जॉय राईडला सुरवात झाली. यासाठी एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन व खापरी मेट्रो स्टेशनला शिक्षकांनी भेट दिली. खापरी व न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर शिक्षकांनी नागपूरच्या भविष्यातील दळणवळणाच्या व्यवस्थेचा अनुभव घेतला.