‘रासेयो’तून घ्या समाजरक्षणाचे धडे

By Admin | Updated: June 17, 2014 00:47 IST2014-06-17T00:47:25+5:302014-06-17T00:47:25+5:30

विद्यापीठांमधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची संधी तर मिळतेच. परंतु यासोबतच समाजरक्षणाचे धडेदेखील मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात

Take lessons from 'NASA' | ‘रासेयो’तून घ्या समाजरक्षणाचे धडे

‘रासेयो’तून घ्या समाजरक्षणाचे धडे

विकासचंद्र रस्तोगी : ‘आव्हान २०१४’ ची सांगता
नागपूर : विद्यापीठांमधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची संधी तर मिळतेच. परंतु यासोबतच समाजरक्षणाचे धडेदेखील मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात राष्ट्रीय सेवा योजनेशी जुळायला हवे, असे मत राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘आव्हान २०१४’ या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रभारी कुलगुरु अनुपकुमार, केंद्र शासनाचे उपसचिव बी.के.मिश्रा, राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी.एस.सैनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यसंपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंके, ‘एनडीआरएफ’चे (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स)डेप्युटी कमांडिंग आॅफिसर विजेंद्र दहिया, प्र-कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. भाऊ दायदार प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यभरातील विद्यापीठांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘लाईफ सेव्हिंग स्कीमह्णमध्ये ‘एनडीआरएफह्णकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. याचा समाजासाठी जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे रस्तोगी म्हणाले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आत्मरक्षणाचे धडे आत्मसात केले पाहिजे, असे मत जी.एस.सैनी यांनी व्यक्त केले. प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी ‘आव्हान २०१४’ चा संदेश राज्याच्या प्रत्येकच जिल्ह्यात पोहचविण्याचे काम करण्याचे आवाहन केले. डॉ. भाऊ दायदार यांनी दहा दिवसांच्या उपक्रमातील कार्यक्रमाची माहिती दिली. ‘आव्हान’ या उपक्रमात २३ विद्यापीठातील १ हजारहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Take lessons from 'NASA'