शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

अभिनाश कुमार यांच्यावर कारवाई करा

By admin | Updated: June 15, 2016 03:14 IST

कर्तव्यावर असलेल्या महिला छायाचित्रकाराचा कॅमेरा हिसकावून त्यांच्याशी असभ्य वर्तन करणारे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्यावर कारवाई करून

महिला छायाचित्रकाराशी असभ्य वर्तन : पत्रकार संघाची पोलीस आयुक्तांना मागणीनागपूर : कर्तव्यावर असलेल्या महिला छायाचित्रकाराचा कॅमेरा हिसकावून त्यांच्याशी असभ्य वर्तन करणारे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्यावर कारवाई करून पुन्हा असा प्रकार घडणार नाही यासंबंधी दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर श्रमिक पत्रकार संघ तसेच प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. यासंबंधाने मंगळवारी दुपारी पत्रकारांचे एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांना भेटले. एका प्रतिष्ठित दैनिकाच्या छायाचित्रकार मोनिका चतुर्वेदी या सोमवारी दुपारी जरीपटक्यातील लाठीमार आणिं तणावाच्या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडत असताना पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी तिला विरोध केला. मोनिकाचा कॅमेरा हिसकावून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. ते पाहून दुसऱ्या एका पोलिसाने दुसऱ्या दैनिकातील एका छायाचित्रकाराची कॉलर पकडली. तिसऱ्याने शिवीगाळ केली. हा सर्व संतापजनक प्रकार अन्य एका छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. तो सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली. पत्रकारजगतातूनच नव्हे तर विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि मान्यवरांनी अभिनाश कुमार यांच्या या कृतीचा निषेध नोंदवून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनाही सोमवारीच या घटनेची माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्त यादव यांची भेट घेऊन उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या वर्तणुकीचे किस्से त्यांना सांगितले. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. पीडित छायाचित्रकार मोनिका चतुर्वेदी हिनेही झालेली घटना सांगितली. आयुक्तांनी यावेळी बोलताना झालेली घटना अतिशय खेदजनक असल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा असा प्रकार घडणार नाही याबाबत योग्य उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, एनयूडब्ल्यूजेचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, महासचिव शिरीष बोरकर, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश टिकले, ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव, राजेश तिवारी, हरीश तिवारी यांच्यासह अनेक पत्रकार आणि छायाचित्रकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)