तडीपार गुंडाने धुमाकूळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला
By दयानंद पाईकराव | Updated: November 11, 2023 18:10 IST2023-11-11T18:07:44+5:302023-11-11T18:10:32+5:30
सार्वजनिक ठिकाणी हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ

तडीपार गुंडाने धुमाकूळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला
नागपूर : तडीपार असताना शहरात येऊन हातात चाकु घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी शनिवारी सकाळी ११.१५ वाजता बेड्या ठोकल्या आहेत.
नविन मिलींद बारसे (वय २३, रा. दुर्गा सोसायटी, न्यु येरखेडा कामठी) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. नविनला शहर आणि जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. पाचपावली पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना एक आरोपी राणी दुर्गावती चौकात देशी दारुच्या भट्टीजवळ सार्वजनिक ठिकाणी हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाली. पाचपावली पोलिसांनी घटनास्थळ गाठून संबंधीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेत एक ३०० रुपये किमतीचा लोखंडी चाकु आढळला. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपी नविन विरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५, १४२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास पाचपावली पोलिस करीत आहेत.