शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत अन्न चाचणी प्रयोगशाळा

By admin | Updated: June 3, 2015 02:36 IST

अन्न व औषध विभागाची अन्न चाचणी प्रयोगशाळा नागपुरात या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून भेसळयुक्त पदार्थांचा गुणात्मक व दर्जात्मक

मोरेश्वर मानापुरे नागपूर अन्न व औषध विभागाची अन्न चाचणी प्रयोगशाळा नागपुरात या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून भेसळयुक्त पदार्थांचा गुणात्मक व दर्जात्मक अहवाल तातडीने मिळून संबंधितांवर कारवाई करणे विभागाला शक्य होणार आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. तीन विश्लेषकांची नियुक्तीजवळपास २ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेली प्रयोगशाळा भूगांवकर सभागृह, ओंकारनगर रोड, मानेवाडा रिंग रोडवर ५५०० चौरस फूट जागेत आहे. जवळपास ६० लाख रुपयांची १६ उपकरणे बसविण्यात आली आहेत. स्वत:च्या सॅम्पलद्वारे प्रत्येक उपकरणाची तंतोतंत चाचणी आणि शहानिशा विश्लेषकांद्वारे करण्यात येत आहे. उपकरणे योग्य आहेत वा नाहीत, शासनाच्या प्रमाणकानुसार (स्टॅन्डर्ड) उपकरणांद्वारे अहवाल मिळतो वा नाही, हा या चाचणीचा उद्देश आहे. प्रारंभी अन्न पदार्थांची चाचणी, त्यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या उपकरणांद्वारे औषधांचीही चाचणी या प्रयोगशाळेत होणार आहे. नव्या उपकरणांच्या प्रस्तावाला वित्त विभागाकडून मान्यतेची प्रतीक्षा आहे. प्रयोगशाळेत औरंगाबाद येथून तीन विश्लेषक प्रतिनियुक्तीवर आले आहेत. याशिवाय लिपिकाची नियुक्ती केली असून दुसऱ्याची लवकरच करण्यात येणार आहे. या सर्वांना मुंबई येथील मुख्यालयात गेल्या आठवड्यात प्रशिक्षण देण्यात आले. सध्या ते प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. याशिवाय गेल्या आठवड्यातच प्रयोगशाळेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रत्यक्ष काम या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (औषधी) अशोक गिरी यांनी लोकमतशी बोलताना दिली. नव्याने भरती होणारअन्न चाचणी प्रयोगशाळेत ११० जणांच्या भरतीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाकडे पाठविला आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रयोगशाळेत सहायक संचालक दर्जाचा अधिकारी राहील. जागा भाडे तत्त्वावर ताब्यात घेतल्यानंतर प्रयोगशाळेची विभागवार रचना आणि उपकरणे बसविण्यासाठी एक वर्ष लागले. अन्न पदार्थांची गुणात्मक व दर्जात्मक चाचणीअन्न पदार्थांच्या गुणात्मक आणि दर्जात्मक चाचणीचा अहवाल १४ दिवसांत मिळावा, असा कायदा आहे. पदार्थातील घटक आणि दर्जाच्या आधारे मिळणाऱ्या अहवालाद्वारे अन्न विभागाला संबंधितांवर कठोर कारवाई करणे शक्य होईल. सध्या बाजारात मिळणारे दूध, तूप, लोणी, तेल, डाळी, धान्य, कडधान्य, मैदा, रवा आदी जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. प्रयोगशाळा नागपुरात असल्यामुळे विभागाला एखाद्या वेळी अन्न पदार्थाचा अहवाल तातडीने मिळविणे शक्य होणार असल्याचे गिरी म्हणाले. चर्चेदरम्यान प्रयोगशाळा विश्लेषक अभय कऊटकर उपस्थित होते.