शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातदेखील ‘आयआयएम’च्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:20 IST

Nagpur News ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाचा प्रकोप कायम असतानादेखील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे.

ठळक मुद्देस्टायपेंडमध्ये सरासरी १२ टक्क्यांनी वाढ विद्यार्थ्यांचे ‘बँकिंग’, वित्त, विमा, ‘एज्युकेशन टेक्नॉलॉजी’ क्षेत्राला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांची संख्या वाढली. निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचा कल हा ‘बँकिंग’, वित्त, विमा, तसेच ‘एज्युकेशन टेक्नॉलॉजी’साठी काम करणाऱ्या कंपन्यांकडे जास्त राहिला. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रकोप कायम असतानादेखील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे.

‘आयआयएम-नागपूरच्या’ सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. यंदा २१२ विद्यार्थी ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेला सामोरे गेले. यातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेन्ट’ झाले आहे. यंदा येथे ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत शंभरहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या कंपन्या आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यंदा सर्वात जास्त ‘स्टायपेन्ड’ २.५ लाख इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे, तर सरासरी ‘स्टायपेन्ड’ ६० हजार ९५३ इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात १२.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांनी ‘फिनटेक’, फार्मा कंपन्या, तसेच ‘ई-कॉमर्स’लादेखील प्राधान्य दिले आहे.

‘लॉजिस्टिक हब’ला मिळणार बळ

‘आयआयएम’मधील अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ‘समर इंटर्नशिप’ करणे अनिवार्य असते. ‘आयआयएम’चा दर्जा लक्षात घेता नामांकित कंपन्यांकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. ‘आयटी कन्सल्टिंग’, ‘लॉजिस्टिक्स’, ‘रिटेल’, ‘एफएमसीजी’, ‘मीडिया’, ‘बँकिंग’ इत्यादी क्षेत्रातील कंपन्या या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून नागपूर उदयाला येत असून, या क्षेत्रातील कंपन्यादेखील ‘आयआयएम’मध्ये आल्या होत्या.

उद्योग क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या काळातदेखील आयआयएम-नागपूरला उद्योग क्षेत्राने पसंती दिली आहे. यंदा आव्हानांत वाढ झाली होती. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना जास्त शिकायला मिळाले. शिकतानाच उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळाला, तर दर्जेदार व कुशल विद्यार्थी घडतात. यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात सकारात्मक वातावरणनिर्मितीदेखील होते. यंदा ‘आयआयएम-नागपूर’ने ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत दर्जेदार कंपन्या सहभागी झाल्या. यातूनच संस्थेचा दर्जा वाढत असल्याचे दिसून येते, असे मत ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केले...

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र