शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

४० एकरातील ऊस खाक

By admin | Updated: November 20, 2014 01:01 IST

शॉर्टसर्किटने शेतातील ऊस खाक झाल्याची घटना सावनेर तालुक्यातील आजनी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ४० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून शेतकऱ्याचे ५० लाख रुपयांचे

५० लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटने शेतात लागली आगसावनेर : शॉर्टसर्किटने शेतातील ऊस खाक झाल्याची घटना सावनेर तालुक्यातील आजनी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ४० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून शेतकऱ्याचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आजनी भागातील विद्युतपुरवठा पहाटे ४ वाजतापासून बंद होता. सकाळी १० वाजताच्या सुमारास कनिष्ठ अभियंता कापसे यांनी शहानिशा करून विद्युतपुरवठा सुरू केला. दरम्यान, आजनी येथील पुरुषोत्तम धपके यांच्या शेतात विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात ऊस पेटून खाक झाला. पाहता-पाहता ही आग बाजूच्याच नारायण धपके, मधुकर धपके, लेखराज धपके, आत्माराम कमाले यांच्या शेतापर्यंत गेली. त्यात जवळपास ४० एकरातील ऊस खाक होऊन सदर शेतकऱ्यांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच सावनेर नगर परिषद आणि खापा नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र शेताच्या मध्यभागापर्यंत पोहोचणे अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य नसल्याने हवेच्या गतीसोबत आग पसरत होती. जवळपास ४ तासानंतर आग विझली. (प्रतिनिधी)गावकरी एकवटलेसकाळी लागलेली आग अग्निशमन दलही आटोक्यात आणू शकला नाही. हे पाहता गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे ही आग गावाच्या दिशेने गेली नाही म्हणून बरे झाले. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. आगीबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी आतराम, सावनेरचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांना माहिती मिळताच तेसुद्धा पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता कापसे यांच्यावर संताप व्यक्त केला. उपअभियंता चंद्रकांत मोहाडीकर हे घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांच्याकडे कापसे यांच्याबाबत तक्रार करीत कारवाईची मागणी केली. पुढील तपास ठाणेदार सपकाळ करीत आहे.