शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सबसिडीचा गोलमाल!

By admin | Updated: May 14, 2014 00:43 IST

महावितरण वीज दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मिळणार्‍या सबसिडीत गोलमाल करीत आहे. हा संपूर्ण घोळ फ्रेंचायसीच्या शहरात होत असून,

फ्रें चायसीचा निधी महावितरणच्या खिशात :

नागपूरसह तीन शहरांना फटका

कमल शर्मा - नागपूर

महावितरण वीज दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मिळणार्‍या सबसिडीत गोलमाल करीत आहे. हा संपूर्ण घोळ फ्रेंचायसीच्या शहरात होत असून, यामध्ये नागपूरसह औरंगाबाद व भिवंडी शहराला फटका बसत आहे. महावितरण या शहरांना वीजपुरवठा करण्यासाठी फ्रेंचायसीला महागडी वीज देत आहे. महावितरण व फ्रेंचायसी दोन्ही कंपन्यांचे अधिकारी दबक्या आवाजात या अन्यायाची कबुली देत आहेत. विशेष म्हणजे, राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) गत काही महिन्यांपूर्वी महाजनकोच्या वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. ती परवानगी उत्पादन खर्चातील वाढ व जुन्या नुकसान भरपाईसाठी देण्यात आली होती. त्यानुसार वीजदरात १६ ते २0 टक्क्यांची वाढ करून, महावितरण वीज ग्राहकांकडून ५ हजार २२ कोटी रुपये वसूल करणार होते. मात्र राज्य सरकारने लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन २0 जानेवारी रोजी तो दरवाढीचा बोजा स्वत:च्या डोक्यावर घेतला होता; शिवाय त्यासाठी महावितरणला प्रत्येक महिन्याला ६0६ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जाणकारांच्या मते, महावितरणने येथूनच गोलमाल सुरू केला. राज्य सरकाराने संपूर्ण राज्यासाठी सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे यात फ्रेंचायसी शहरांचाही समावेश असून, त्यांनाही सबसिडीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. परंतु महावितरण या शहरातील सबसिडीची रक्कम स्वत:च्या घशात घालत आहे. सबसिडीचा फ्रेंचायसी कंपन्यांना कोणताही लाभ दिला जात नाही. विशेष म्हणजे, त्या निधीतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास मदत मिळाली असती. महावितरणच्या एका अधिकार्‍याच्या मते, नियमानुसार फ्रेंचायसी कंपन्यांना सबसिडीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)