शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘क्वाड्रोटर’च्या झेपेवर विद्यार्थी मोहित

By admin | Updated: January 30, 2015 00:56 IST

लोकमत कॅम्पस क्लबच्यावतीने श्री सार्इं संस्कार विद्या निकेतन व ज्युनियर कॉलेज प्रस्तुत ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले होते. निवडक शाळांमध्ये आयोजित या ‘शो’ला विद्यार्थ्यांचा

एरोमॉडेलिंग शो : लोकमत कॅम्पस क्लबचा उपक्रम नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबच्यावतीने श्री सार्इं संस्कार विद्या निकेतन व ज्युनियर कॉलेज प्रस्तुत ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले होते. निवडक शाळांमध्ये आयोजित या ‘शो’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषत: ‘क्वाड्रोटर’ विमानाच्या झेपेवर विद्यार्थी मोहित झाले होते. बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती व या क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, हा या ‘शो’चा उद्देश होता. या ‘शो’च्या माध्यमातून पुण्याचे एरोनॉटिकल अभियंता प्रणवकुमार चिट्टे यांनी शाळांशाळांमध्ये जाऊन नव्या तंत्रज्ञानाच्या विमान क्वाड्रोटरच्या संदर्भात माहिती दिली. सोबत त्याला उडवूनही दाखविले. या छोट्या विमानाचा उपयोग सर्वेक्षण, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, चित्रपट आदींमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चिट्टे यांनी सांगितले.बुधवारी सेंट पॉल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून या ‘शो’ची सुरुवात झाली. या प्रसंगी शाळेचे संचालक डॉ. राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य देवांगना पुंडे, मुख्याध्यापक संगीता पिस्के उपस्थित होते. वानाडोंगरी येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स मध्ये ‘एरोमॉडेलिंग शो’ सादर करण्यात आला. यावेळी प्राचार्य कविता नागराजन, उपप्राचार्य भूषण बोंडे उपस्थित होते. मेजर हेमंत जकाते विद्या निकेतनमध्येही हा ‘शो’ झाला. यावेळी प्रामुख्याने संचालक शीला मुडे, मधुसूदन मुडे व शिक्षकगण उपस्थित होते. श्री साई संस्कार विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजमधील या ‘एरोमॉडेलिंग शो’ला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी कॉलेजचे संचालक डॉ. संगीता कुकडे, शिक्षक संगीता दिवसे, शीतल ठाकरे, वर्षा कोंडातकर उपस्थित होत्या. टिळक विद्यालयातही आयोजित या ‘शो’च्यावेळी मुख्याध्यापक वैष्णवी पोहरकर आणि अन्य शिक्षकगण उपस्थित होते. (प्रतिनिधी)