‘क्वाड्रोटर’च्या झेपेवर विद्यार्थी मोहित

By Admin | Updated: January 30, 2015 00:56 IST2015-01-30T00:56:24+5:302015-01-30T00:56:24+5:30

लोकमत कॅम्पस क्लबच्यावतीने श्री सार्इं संस्कार विद्या निकेतन व ज्युनियर कॉलेज प्रस्तुत ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले होते. निवडक शाळांमध्ये आयोजित या ‘शो’ला विद्यार्थ्यांचा

Students are fascinated by the 'Quadrot' | ‘क्वाड्रोटर’च्या झेपेवर विद्यार्थी मोहित

‘क्वाड्रोटर’च्या झेपेवर विद्यार्थी मोहित

एरोमॉडेलिंग शो : लोकमत कॅम्पस क्लबचा उपक्रम
नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबच्यावतीने श्री सार्इं संस्कार विद्या निकेतन व ज्युनियर कॉलेज प्रस्तुत ‘एरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले होते. निवडक शाळांमध्ये आयोजित या ‘शो’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषत: ‘क्वाड्रोटर’ विमानाच्या झेपेवर विद्यार्थी मोहित झाले होते. बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती व या क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, हा या ‘शो’चा उद्देश होता.
या ‘शो’च्या माध्यमातून पुण्याचे एरोनॉटिकल अभियंता प्रणवकुमार चिट्टे यांनी शाळांशाळांमध्ये जाऊन नव्या तंत्रज्ञानाच्या विमान क्वाड्रोटरच्या संदर्भात माहिती दिली. सोबत त्याला उडवूनही दाखविले. या छोट्या विमानाचा उपयोग सर्वेक्षण, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, चित्रपट आदींमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चिट्टे यांनी सांगितले.
बुधवारी सेंट पॉल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून या ‘शो’ची सुरुवात झाली. या प्रसंगी शाळेचे संचालक डॉ. राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य देवांगना पुंडे, मुख्याध्यापक संगीता पिस्के उपस्थित होते. वानाडोंगरी येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स मध्ये ‘एरोमॉडेलिंग शो’ सादर करण्यात आला. यावेळी प्राचार्य कविता नागराजन, उपप्राचार्य भूषण बोंडे उपस्थित होते. मेजर हेमंत जकाते विद्या निकेतनमध्येही हा ‘शो’ झाला. यावेळी प्रामुख्याने संचालक शीला मुडे, मधुसूदन मुडे व शिक्षकगण उपस्थित होते. श्री साई संस्कार विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजमधील या ‘एरोमॉडेलिंग शो’ला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी कॉलेजचे संचालक डॉ. संगीता कुकडे, शिक्षक संगीता दिवसे, शीतल ठाकरे, वर्षा कोंडातकर उपस्थित होत्या. टिळक विद्यालयातही आयोजित या ‘शो’च्यावेळी मुख्याध्यापक वैष्णवी पोहरकर आणि अन्य शिक्षकगण उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Students are fascinated by the 'Quadrot'