शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशीच घेतली विद्यार्थ्याने फाशी; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 10:42 IST

कुटुंबीयांसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने वाढदिवसाच्या दिवशी फाशी घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देकिरकोळ वादाचाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंबीयांसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने वाढदिवसाच्या दिवशी फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंगोलेनगर येथे घडली. मृत १९ वर्षीय नितीन उदयभान साहू आहे.महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या नितीनच्या घरी किराणा दुकान आहे. कुटुंबात आईवडिलांबरोबरच मोठी बहीण आहे. मंगळवारी नितीनचा जन्मदिवस होता. कुटुंबीयांनी नितीनसोबत सायंकाळी वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले होते. दुपारी नितीन अचानक मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला. तो रात्री ८ वाजता परतला. घरच्यांनी विचारल्यावर मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करण्यास गेल्याचे त्याने सांगितले. कुटुंबीयांनी त्याला बाहेर कोरोनाचे संक्रमण असल्यामुळे घरातच वाढदिवस सादर करायचा होता, असा सल्ला दिला. यावरून नितीनचा घरच्यांसोबत किरकोळ वाद झाला.

घरच्यांसोबत वाद झाल्याने नितीन शेजारी राहणाऱ्या काकाच्या घरी जाऊन झोपला. कुटुंबीयांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पण बुधवारी पहाटे ५ वाजता नितीनची बहीण छतावर जात असताना, तिला नितीन जिन्याखाली फाशीवर लटकताना दिसला. नितीनने आईच्या साडीने गळफास लावला. कुटुंबीयांनी त्याला खाली उतरवून खासगी दवाखान्यात नेले, तेव्हा नितीनचा श्वास सुरू होता, परंतु रुग्णालयाने त्याला भरती करून घेण्यास नकार देत मेडिकलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मेडिकलमध्ये पोहचेपर्यंत नितीनचा जीव गेला होता.

नितीनने पहाटे पहाटे फाशी घेतल्याचा संशय आहे. नितीनची अवस्था बघून त्याच्या आईची शुद्ध हरवली होती. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीससुद्धा घटनास्थळी पोहचले. हवालदार रमेश विंचूरकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. एकुलत्या एका मुलाने जन्मदिनालाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शाहू कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्या