शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट मशीन नसल्याने स्टारबस सेवेत अडथळा

By admin | Updated: April 3, 2017 02:55 IST

नागपूर शहरात मार्चपर्यत ४३२ बसेस धावणार असल्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली होती.

डीआयएमटीएसच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : ४३२ पैकी २०० बसेस रस्त्यावर नागपूर : नागपूर शहरात मार्चपर्यत ४३२ बसेस धावणार असल्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली होती. परंतु प्रत्यक्षात २०० बसेस शहरातील रस्त्यावर धावत आहेत. बसेस कमी असल्याने प्रवासी व विद्यार्थी त्रस्त आहेत. यामुळे शहर वाहतुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम लि. (डीआयएमटीएस )यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच कंपनीवर इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन उपलब्ध करण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. यामुळे स्टारबस सेवेत अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी वंश निमय व स्कॅनिया कंपनीच्या लाल रंगाच्या अशा एकूण ४३२ बसेस शहरातील रस्त्यांवर होत्या. १ मार्च २०१७ पासून शहरातील वाहतूक व्यवस्था नवीन बस आॅपरेटरकडे सोपविण्यात आली. बसेसचे मार्ग निश्चित करणे, कंडक्टरची नियुक्ती, तिकीट विक्रीचा महसूल गोळा करणे व सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करण्याची जबाबदारी डीआयएमटीएस यांच्यावर सोपविण्यात आली होती. सध्या शहरात २०० बसेस धावत असून प्रत्येक बसला दोन तिकीट मशीनची गरज आहे. परंतु केवळ २०० मशीन उपलब्ध आहेत. यामुळे उर्वरित बसेच उभ्या असल्याने महापालिकेचा महसूल बुडत असल्याची माहिती आहे. बसेसची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळत नाही. त्यातच इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कंडक्टरला करावी लागते १६ तास ड्युटी नियमानुसार स्टरबस कंडक्टरची ८ तासांची ड्युटी आहे. परंतु त्यांना १६ तास ड्युटी करावी लागते. आरोग्याचा विचार न करता त्यांना काम करावे लागत आहे. वंश निमय यांनी कमी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत समावून न घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात सर्व बसेस धावल्या असत्या तर सर्व कर्मचाऱ्यांना काम मिळाले असते. या संदर्भात सहायक कामगार आयुक्तांनीही महापालिका प्रशासनाला फटकारले आहे. साध्या तिकिटाचा वापर का नाही? इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनचा तुटवडा आहे तर साध्या तिकिटांचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या तिकिटांचा वापर केला तर शहरबस सेवेवर याचा परिणाम होणार नाही. शहरातील रस्त्यावर सर्व ४३२ बसेस धावतील. प्रवाशांनाही त्रास होणार नाही. महापालिकेच्या महसुलात वाढ होईल. परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.