शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा

By योगेश पांडे | Updated: October 15, 2024 21:48 IST

भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील वाचाळवीरांविरोधात भारतीय जनता पक्षाने कठोर भूमिका घेतली आहे. रामटेकमध्ये माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना निलंबित केल्यानंतर पक्षात खळबळ उडाली असताना प्रदेशाध्यक्षांनी इतर ठिकाणीदेखील आवश्यकता पडल्यास असेच पाऊल उचलण्यात येईल, अशी भूमिका मांडली आहे. भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

मागील काही काळापासून पक्षातील वाचाळवीरांमुळे महायुतीत दरी निर्माण होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. राज्यातील विविध भागांमध्ये अशा वाचाळ पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष अडचणीत येत होता. मागील महिन्यातच बावनकुळे यांनी अशा नेत्यांना इशारा दिला होता. मात्र तरीदेखील काही जणांनी तशीच भूमिका ठेवली आहे. पक्षाच्या धोरणांविरोधात भूमिका घेतल्यामुळे रेड्डी यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. मात्र केवळ रेड्डींवरच कारवाई थांबणार नसल्याचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत. पक्षाने काही कठोर निर्णय घेतले आहे. पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षाच्या अंतर्गत विषयाला सार्वजनिकपणे बोलत पक्षशिस्तीचे उल्लंघन करणे असे प्रकार काही जणांकडून करण्यात आले. पुढील काळात महायुतीविरोधात जो नेता किंवा कार्यकर्ता जाहीर बोलेल किंवा बंड पुकारेल त्याविरोधात कारवाई होईल. पक्षाच्या मंचावर निश्चित प्रत्येकाला नाराजी मांडता येईल, मात्र सार्वजनिकपणे पक्षविरोधी भूमिका मान्य करण्यात येणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

- निवडणूक आयोगाविरोधात बोलण्याचा मुद्दाच नाहीविधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर विरोधी पक्षांकडून सरड्यासारखा रंग बदलण्यात आला आहे. ते एकाच टप्प्यात निवडणूक का आहे असा सवाल करत आहेत. मात्र लोकसभेत सात टप्प्यात निवडणूक झाली तेव्हादेखील त्यांनी टीका केली होती व आता महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होत असताना ते परत निवडणूक आयोगाविरोधात बोलत आहेत. त्यांना निवडणूकीत पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते असा प्रकार करत आहेत, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर