शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
5
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
6
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
7
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
8
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
9
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
10
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
11
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
18
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
19
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
20
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानांशी ताकदीने लढणारे व्यक्तिमत्त्व

By admin | Updated: July 21, 2014 00:57 IST

आजच्या स्पर्धेच्या काळात वकिली व्यवसायात पाय रोवणे कुण्या मुलाबाळांचा खेळ राहिलेला नाही. बौद्धिक कणखरतेची सतत परीक्षा घेणाऱ्या या क्षेत्रात अथक परिश्रमानेच वर

रोहित देव : केंद्र शासनाचा हायकोर्टातील दुवानागपूर : आजच्या स्पर्धेच्या काळात वकिली व्यवसायात पाय रोवणे कुण्या मुलाबाळांचा खेळ राहिलेला नाही. बौद्धिक कणखरतेची सतत परीक्षा घेणाऱ्या या क्षेत्रात अथक परिश्रमानेच वर चढले जाऊ शकते. वकिली व्यवसायाची कोणतीही परंपरा नसलेल्यांना तर पदोपदी संघर्ष करावा लागतो. दोन दिवसांपूर्वी ‘एएसजीआय’(अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया)पदी नियुक्ती झाल्याने अचानक चर्चेत आलेले अ‍ॅड. रोहित देव आव्हानांना तोंड देतच पुढे आले आहेत. त्यांच्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केंद्र शासनाची बाजू बळकट होणार आहे.केंद्रात सत्ताबदल होताच शासनाची कायदेविषयक बाजू सांभाळणाऱ्यांची अख्खी टीमच बदलविण्यात आली आहे. सर्वप्रथम केंद्र शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅटर्नी जनरलपदी अ‍ॅड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर सॉलिसिटर जनरलपदी रणजित कुमार यांची नियुक्ती झाली. दोघांचेही सहायक म्हणून देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल कार्यरत असतात. अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल यांच्या हाताखालील पॅनलमध्येही अनेक वकील असतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेल्या काही वर्षांपासून अ‍ॅड. एस. के. मिश्रा ‘एएसजीआय’ होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. ‘एएसजीआय’पदाचे महत्त्व व जबाबदाऱ्या पाहता त्यावर संघर्षशील व्यक्तीची नियुक्ती होणे अपेक्षित होते. अ‍ॅड. रोहित देव यांच्या रूपाने या पदाला सुयोग्य व्यक्ती लाभली आहे. अ‍ॅड. देव हे मूळचे नागपूरकर असून, त्यांचे सर्व शिक्षण येथेच झाले आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून १९८६ मध्ये एलएलबी पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्य केले. १९९० पासून त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. वकिली व्यवसायाची परंपरा नसलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने ते या व्यवसायाकडे आकर्षित झाले. यानंतर त्यांनी परिश्रमाच्या बळावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करून ‘एएसजीआय’पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचे मोठे बंधू शिरीष देव (डायरेक्टर जनरल आॅफ एअर आॅपरेशन्स) भारतीय वायुसेनेत कार्यरत आहेत.उच्च न्यायालयात केंद्र शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी प्रामुख्याने कोळसा, वीज, माहिती व प्रसारण आणि वैद्यकीय मंत्रालयातील प्रकरणे गाजत आहेत. अ‍ॅड. देव यांना केंद्र शासनाची बाजू सांभाळताना ताकदीने सामोरे जावे लागणार आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता ते आपल्या जबाबदाऱ्यांना न्याय देतील, यात कुणाचेही दुमत नसावे. अ‍ॅड. देव गेल्या २७ वर्षांपासून वकिली व्यवसायात असून, त्यांनी हजारावर प्रकरणे हाताळली आहेत. त्यांचा राज्य शासनाच्या ‘ए’ पॅनल वकिलांमध्ये समावेश होता. २५० महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रवेशबंदीच्या प्रकरणात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून विशेष वकील म्हणून काम पाहिले होते. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. ‘एएसजीआय’ म्हणून ते पुढील तीन वर्षांपर्यंत केंद्र शासनाचा उच्च न्यायालयातील सक्षम आधार असणार आहेत. (प्रतिनिधी)केंद्र शासनाची उच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. रोहित देव यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद केंद्र सरकार आणि उच्च न्यायालय यातील महत्त्वाचा दुवा आहेत. यानिमित्त त्यांच्याविषयी आम्ही ही विशेष माहिती देत आहोत.