वादळाचा तडाखा :

By Admin | Updated: May 26, 2014 01:09 IST2014-05-26T01:09:01+5:302014-05-26T01:09:01+5:30

रविवारी दिवसभर जीवाची लाहीलाही करणारे ऊन होते. पण सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने नागपूरकरांना काहिसा गर्मीपासून दिलासा दिला. सायं. ५.३0 च्या सुमारास अचानक वादळ आले.

Storm Strike: | वादळाचा तडाखा :

वादळाचा तडाखा :

 रविवारी दिवसभर जीवाची लाहीलाही करणारे ऊन होते. पण सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने नागपूरकरांना काहिसा गर्मीपासून दिलासा दिला. सायं. ५.३0 च्या सुमारास अचानक वादळ आले. आकाशात ढगांची गर्दी झाली. पण पाऊस कोसळला नाही. वादळी वार्‍यांमुळे रस्त्यांवर जवळपास एक तास प्रचंड धूळ उडत होती, त्याचा वाहतुकीला चांगलाच त्रास होत होता. पण काही वेळात रिमझिम पावसाने हजेरी लावली आणि गर्मीपासून सुटका मिळाली. अचानक मिळालेल्या या गारव्याने नागपूरकर सुखावले. काही उत्साही तरुण मंडळींनी या पावसात भिजण्याचाही आनंद लुटला. वादळामुळे जाहिरातीच्या फलकाची अशी अवस्था झाली.

Web Title: Storm Strike: