शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला पुन्हा वादळाचा फटका

By admin | Updated: June 3, 2015 02:43 IST

जिल्ह्यातील मौदा व भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये रविवारी रात्री वादळामुळे काही घरांचे नुकसान झाले होते.

नागपूर : जिल्ह्यातील मौदा व भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये रविवारी रात्री वादळामुळे काही घरांचे नुकसान झाले होते. त्यातच मंगळवारी दुपारी व सायंकाळी सावनेर, नरखेड, नागपूर (ग्रामीण), उमरेड, मौदा, रामटेक, कळमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये वादळामुळे घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. रामटेक व कळमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये तुरळक गारपीटही झाली. वादळामुळे प्राणहानी झाली नसली तरी, काही घरांवरील छप्पर उडाल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. सावनेर शहरासह परिसरातील काही गावांमध्ये मंगळवारी दुपारी वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम), मोहगाव (भदाडे) परिसरात वादळासह पावसाने हजेरी लावली. कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी (खु), तिष्टी (बु), तेलगाव, बादेरा, तिडंगी, कोहळी परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे तिष्टी (खु) व तिष्टी (बु) येथील काही घरांवरील छप्पर उडाले. या शिवारातील झाडे उन्मळून पडली होती. विजेचे खांब वाकल्याने या गावांमधील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. रामटेक तालुक्यातील नगरधन व काचूरवाही तसेच मौदा तालुक्यातील चाचेर परिसरात सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. या ठिकाणी बोराच्या आकाराची गारपीटही झाली. कुही तालुक्यातील कुही मांढळ, वेनतूर, आंभोरा, साळवा, राजोला, तारणा, गोठणगाव जीवनापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. धामणा परिसरात वादळी पावसामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली होती. रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात दुपारपासूून जोरात हवा वाहायला सुरुवात झाली होती. त्यामुळे देवलापार व परिसरातील काही गावांमधील वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. मौदा शहरासह तालुक्यातील गांगनेर, मांगली, नरसाळा परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळासह पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे काहींच्या घरांवरील टिनपत्र्यांचे व गवताचे छप्पर उडाले. काहींच्या घरांवरील कवेलू उडाल्याने त्यांचे नुकसान झाले. मौदा परिसरात अंदाजे एक तास मुसळधार पाऊस बरसला. या पावसाचा मौदा शहरातील नाथनगर, चक्रधरनगर, गरदेव मोहल्ल्यातील कच्च्या घरांचे नुकसान झाले. वादळामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे पारा अचानक खाली उतरला. तापमानातील या चढ-उतारामुळे मुले व वयोवृद्ध मंडळी आजारी होण्याची शक्यता बळावली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. (प्रतिनिधींकडून)