शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या नावावर गाड्या उचलणे थांबवा

By admin | Updated: July 6, 2014 00:54 IST

शहरात पार्किंगच्या नावावर सध्या अनधिकृत कारवाई सर्रासपणे सुरू आहे. कुठल्याही रस्त्यावरील दुचाकी वाहने सर्रास उचलून नेली जातात. वाहतुकीला अडथळा असल्याचे सांगून ही कारवाई केली जाते.

‘आप’ची निदर्शने : वाहतूक यंत्रणा सुधारण्याची मागणी नागपूर : शहरात पार्किंगच्या नावावर सध्या अनधिकृत कारवाई सर्रासपणे सुरू आहे. कुठल्याही रस्त्यावरील दुचाकी वाहने सर्रास उचलून नेली जातात. वाहतुकीला अडथळा असल्याचे सांगून ही कारवाई केली जाते. मात्र या कारवाईतही भेदभाव केला जात आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या अनधिकृत कारवाईच्या विरोधात शनिवारी विधानभवन रोडवरील वाहतूक विभागासमोर निदर्शने करण्यात आली. आधी पार्किंगची व्यवस्था करा, त्यानंतरच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे ही जनहिताचीच बाब आहे. परंतु शहरातील बहुतेक रोडवर पार्किंगची व्यवस्था कोठे करण्यात आली आहे, याची कुठलीही माहिती दिली जात नाही. रोडच्या काठावर पिवळे पट्टे दिसेनासे झाले आहेत. नो पार्किंगचे बोर्डही नाहीत. असे असतानाही नो पार्किंगच्या नावावर दुचाकी वाहने सर्रास उचलली जात आहेत. चारचाकी वाहनांवरही कारवाई केली जाते. परंतु जड वाहनांवर मात्र कारवाई होताना दिसून येत नाही. नियमानुसार अनधिकृत ठिकाणी वाहन पार्क करण्यात आल्यास त्यावर कारवाई करण्यापूर्वी अगोदर १०० मीटरपर्यंत ऐकायला जाईल अशाप्रकारे ध्वनिक्षेपकावर घोषणा करणे आवश्यक आहे. घोषणा केल्यावर १५ मिनिटे वाट पाहावी. त्यानंतरही वाहन चालक न आल्यास चालान आकारून दंड ठोठावण्यात यावा. एखादा वाहन चालक १० तासापर्यंत आलाच नाही तर अगदी जवळच्या ठिकाणी गाडी घेऊन जावी, परंतु असे होत नाही. वाहन चालकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा अगोदर पार्किंगची व्यवस्था करा आणि त्यानंतरच कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात अंबरेश सावरकर, ज्योती कन्हेरे, अश्विन मोटघरे, मंगेश तेलंग, कविता सिंगन, जगजित सिंग, रवींद्र गिंदोळे, सतविंदर सिंग, सोनू फटिंग, डॉ. अशोक लांजेवार, संजय देऊळकर, डॉ. जीवतोडे आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)