कामठीत दाेन दुकानात चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST2021-07-14T04:11:43+5:302021-07-14T04:11:43+5:30

कामठी : अज्ञात चाेरट्याने शहरातील वेगवेगळ्या भागातील दाेन दुकानातून ९९ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना कामठी ...

Stealing at Daen shop in Kamathi | कामठीत दाेन दुकानात चाेरी

कामठीत दाेन दुकानात चाेरी

कामठी : अज्ञात चाेरट्याने शहरातील वेगवेगळ्या भागातील दाेन दुकानातून ९९ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवारी बाजार व फेरूमल चाैकात साेमवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

शुक्रवारी बाजार मच्छी मार्केट लाईनमधील अजमेरी किराणा दुकानाचे शटर ताेडून अज्ञात चाेरट्याने आत प्रवेश केला. दुकानातील ड्रॉवर व काऊंटरमधून राेख ७७ हजार रुपये चाेरून नेले. तसेच याच भागातील फेरूमल चाैकातील अकील अहमद यांच्या दुकानातील काही साहित्य व कपाटातील राेख २,५०० रुपये घेऊन चाेरट्याने पाेबारा केला. याप्रकरणी माेहम्मद नासीम माेहम्मद इसाक रा. कळमना राेड, कामठी यांच्या तक्रारीवरून कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Stealing at Daen shop in Kamathi