विदर्भवाद्यांनी जाळला उपमुख्यमंत्र्यांचा पुतळा

By Admin | Updated: August 14, 2014 01:22 IST2014-08-14T01:22:10+5:302014-08-14T01:22:10+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे एका जाहीर कार्यक्रमात वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज नागपुरात उमटले. विदर्भ जॉईंट अ‍ॅक्शन

Statue of Deputy Chief Minister burnt the Vidarbha | विदर्भवाद्यांनी जाळला उपमुख्यमंत्र्यांचा पुतळा

विदर्भवाद्यांनी जाळला उपमुख्यमंत्र्यांचा पुतळा

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे एका जाहीर कार्यक्रमात वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज नागपुरात उमटले. विदर्भ जॉईंट अ‍ॅक्शन कमिटी व विदर्भ कनेक्ट या संघटनेतर्फे सदर येथील गांधी पुतळ्याजवळ अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
विदर्भ जॉईंट अ‍ॅक्शन कमिटीचे संयोजक अहमद कादर व विदर्भ कनेक्टचे दिनेश नायडू, तेजिंदरसिंग रेणू, जे. पी. शर्मा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
उपस्थित कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनात व अजित पवारांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी केली.
यावेळी संदेश सिंगलकर, अमरदीप सिंग, दिलीप बारापात्रे, रमेश अलोणे, रोशन हिरणवार, किरण गुप्ता, आशा पाटील, शिवप्रकाश हुडे, राहुल थोरात, नाजिर खान, प्यारी बेगम, मो. शफी, शरीफ उन्नीसा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Statue of Deputy Chief Minister burnt the Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.