शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राज्य माहिती आयोगाचा ‘सिटी सर्व्हे’ला दणका

By admin | Updated: March 6, 2016 02:54 IST

शहरातील जागेसंदर्भातील नियमानुसार मागितलेली माहिती न देणे ‘सिटी सर्व्हे’ म्हणजेच भूमिअभिलेख विभागाला महागात पडले आहे.

माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन : तक्रारकर्त्याला दोन हजारांची भरपाई देण्याचे आदेशयोगेश पांडे नागपूरशहरातील जागेसंदर्भातील नियमानुसार मागितलेली माहिती न देणे ‘सिटी सर्व्हे’ म्हणजेच भूमिअभिलेख विभागाला महागात पडले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती न दिल्याचा ठपका ठेवत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने विभागातील अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहे. सोबतच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासाबद्दल जनमाहिती अधिकाऱ्याच्या वेतनातून दोन हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी दिले आहेत.नागपुरातील लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सोसायटीचे सचिव अरविंद गढीकर यांनी मौजा अजनी येथील ८,९८६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेच्या कागदपत्रांबाबत १४ जानेवारी २०१५ रोजी माहिती अधिकारात विचारणा केली होती. यासंदर्भात जनमाहिती अधिकाऱ्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी १३ मार्च २०१५ रोजी प्रथम अपिलीय अधिकारी तसेच भूमापन अधिकारी क्रमांक ३ यांच्याकडे पहिले अपील दाखल केले. या अपिलावर ४५ दिवसांत निर्णय घेणे आवश्यक असताना अपिलीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली नाही. अखेर गढीकर यांनी ३१ जुलै २०१५ रोजी राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील दाखल केले. या अपिलावर राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने १५ सप्टेंबर २०१५ रोजी सुनावणी केली व नगर भूमापन अधिकाऱ्यांना ३० दिवसांच्या आत सुनावणी घेऊन योग्य निर्देश जारी करण्याचा आदेश दिला.परंतु यावर नगर भूमापन अधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. अरविंद गढीकर यांनी माहिती अधिकाराच्या कलम १९ (३) अंतर्गत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाकडे दुसरे अपील दाखल केले. यावर खंडपीठाने १५ जानेवारी २०१६ रोजी सुनावणी घेतली. यावेळी भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी कुठलीही सूचना न देता अनुपस्थित होते. याबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली व याबाबत भूमिअभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी स्वतंत्रपणे चौकशी करून माहिती आयोगास अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले.एकूण पुरावे लक्षात घेता गढीकर यांची बाजू ग्राह्य धरत तक्रार अर्ज मंजूर केला.जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा निर्वाळा दिला. गढीकर यांच्या अपिलावर सुनावणी घ्यावी व त्यांना हवी असलेली माहिती १५ दिवसांच्या आत देण्यात यावी. तसेच त्यांना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासासाठी दोन हजार रुपयांची भरपाई देण्यात यावी, असे निर्देश दिले.