शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या अधिकारावर राज्य सरकारचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर टाकली आहे. राज्य सरकारचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर टाकली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर हल्ला असून, भाजपचा याला तीव्र आक्षेप आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले की, ग्रामविकास व ऊर्जा विभागाने हिटलरशाही निर्णय घेतला आहे. स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठ्याच्या वीज बिलाचा भार जिल्हा परिषद उचलते. परंतु राज्य सरकारने हा भार आता ग्रामपंचायतींवर टाकला आहे. यामुळे राज्यातील २७ हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतींना झटका बसला आहे. त्यांच्यावर जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे बिल आहे. बिल न भरल्यास सरपंच व सचिवांना अयोग्य ठरविण्याची तरतूदसुद्धा केली आहे. या माध्यमातून सरकार ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेला निधी हडपण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी सरपंच प्रांजली वाघ यांनी या निर्णयाविरुद्ध सरपंच आंदोलनाच्या तयारीत असून, ते तुरुंगात जायलाही तयार असल्याचे सांगितले.

- ठिय्या आंदोलन

या निर्णयाविरुद्ध आ. समीर मेघे व आ. टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपने महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले. राज्य सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी अनिल निदान, सदानंद निमकर, मोहन माकडे, प्रांजली वाघ, मंगला कारेमोरे, आतिश उमरे, चंदू हेवट, प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.