शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्टार बसवर दगडफेक

By admin | Updated: September 25, 2016 03:23 IST

हिंगणा-नागपूर मार्गावरील राजीवनगर व परिसरातील शेकडो विद्यार्थी रोज शाळा - महाविद्यालयात स्टार बसने ये-जा करतात.

हिंगणा : हिंगणा-नागपूर मार्गावरील राजीवनगर व परिसरातील शेकडो विद्यार्थी रोज शाळा - महाविद्यालयात स्टार बसने ये-जा करतात. दरम्यान, शनिवारी सकाळी राजीवनगर येथे स्टार बस उशिरा आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बसवर दगडफेक केली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. त्यात स्टार बसच्या मागच्या काचा फुटल्या. ही घटना शनिवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.
हिंगणा, रायपूर, वानाडोंगरी, राजीवनगर यासह परिसरातील शेकडो विद्यार्थी रोज स्टार बसने नागपूरला शाळा-महाविद्यालयात जातात. यातील बहुतांश विद्यार्थी पासधारक आहेत. हिंगण्याहून नागपूरला जाणारी स्टार बस रोज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास राजीवनगर थांब्यावर येते.
नेहमीप्रमाणे राजीवनगर बसथांब्यावर विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत उभे होते. एमएच-३१/सीए-६१४२ क्रमांकाची स्टार बस शनिवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास राजीवनगरात पोहोचली.
विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत उभे असताना चालकाने बस या थांब्यावर न थांबविता थेट नागपूरला निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मागून बसच्या दिशेने दगडफेक केली. त्यात या बसच्या मागच्या काचा फुटल्या. परिणामी, चालक नीतेश शामराव माने याने सदर बस थोडी थांबविली आणि थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेली.
या घटनेनंतर अर्ध्या तासात एकापाठोपाठ एक अशा एकूण पाच स्टार बस नागपूरच्या दिशेने निघून गेल्या. परंतु, एकही बस राजीवनगर बसथांब्यावर थांबविण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागले.
राजीवनगरातील बसथांब्यावर नेहमीच बस थांबविली जात नाही, असा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे शाळेत जाण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)